चोरीतील संशयित मुंबईत अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरीतील संशयित मुंबईत अटक
चोरीतील संशयित मुंबईत अटक

चोरीतील संशयित मुंबईत अटक

sakal_logo
By

घरफोडी प्रकरणी
मुंबईत एकास अटक
रत्नागिरीः शहरातील थिबापॅलेस येथील बंगला फोडून ३७ हजार ६७५ रुपयाचा ऐवज लांबवणाऱ्या संशयिताला पोलिसांनी मुंबई-गोवंडी येथे अटक केली. शहर पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याला न्यायालयाने १ दिवसाची पोलिस कोठडी सुनवाली. बाबू शेख (वय ३८, मुळ रा. छत्तीसगड, सध्या रा. मुंबई) असे शहर पोलिसांनी अटक केलेल्या संशय़िताचे नाव आहे. शहर पोलिसांच्या पथकाने त्याला गोवंडी-मुंबईतून अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून शहरातील घरफोडीत त्याचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी त्याला प्रथम मारूती मंदिर येथील गांधी यांचा बंगला फोडून लाखोंचा ऐवज लांबवल्या प्रकरणात त्याला अटक केली होती. नंतर त्याच पद्धतीने थिबा पॅलेस येथील डॉ. मिलिंद कुलकर्णी (वय ५३, रा. रत्नेश्वर कृपा, थिबा पॅलेस, रत्नागिरी) यांचा बंगला फोडल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता बाबू शेखला अटक दाखवून न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.