कणकवलीत पाडव्यानिमित्त
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

कणकवलीत पाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

कणकवलीत पाडव्यानिमित्त
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा
कणकवली,ता. १५ ः हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवलीतर्फे गुढीपाडव्या निमित्त हिंदू नववर्ष स्वागतयात्रा बुधवारी (ता.२२) दुपारी साडेतीनला आयोजित केली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक मार्गे विद्यामंदिर मैदान अशी ही यात्रा असणार आहे. विद्यामंदिरच्या पटांगणावरील शिवारा मंदिर येथे यात्रेचा समारोप होणार आहे. यामध्ये भारतमातेचा वेशभूषेचा रथ, ओम् असलेले भगवे झेंडे घेतलेले ध्वजपथक, वारकरी दिंडी, धनगरी नृत्य (गजानृत्य) पारंपरिक वेशभूषेत स्त्री-पुरुष व लहान मुले, भव्य दुचाकी रॅली, ढोल पथक, लेझीम पथक, महिला ढोल पथक, असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. स्वागतयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com