
समन्वयक समितीचा रविवारी चौकुळला मेळावा
समन्वयक समितीचा
रविवारी चौकुळला मेळावा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः गावर्हाटी पुरस्कृत समन्वयक समितीची बैठक व स्नेहमेळावा चौकुळ येथे रविवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता येथील सातेरी भावई मंदिर परिसरात आयोजित केला आहे.
गावर्हाटी पुरस्कृत समन्वयक समितीच्या यापूर्वी आंबोली, सांगेली, माडखोल, उपवडे, फणसवडे, आंबेगाव, कालेली (कुडाळ) या गावांत बैठका आयोजित केल्या होत्या. या बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावातील जाणकार व्यक्तींना बोलण्याची संधी दिली जाते. आपल्या गावातील रीतिरिवाज, परंपरा, संस्कृती, गाव मर्यादा, देवदेवस्की याबाबत चर्चा केली जाते. समस्या असतील तर गावात जाऊन सोडविण्यासाठी सभा घेतल्या जातात. या समितीत आंबोली, चौकुळ, गेळे, फणसवडे, पारपोली, दाणोली, ओवळीये, देवसू, माडखोल, वेर्ले, सांगेली, शिरशिंगे, आंबेगाव, कोलगाव, कुणकेरी, माजगाव, आजगाव, ओटवणे, कांदूर, कलंबिस्त, सातोळी, मळगाव, उपवडे, माणगाव, झोळंबे, बांदा, पिंगुळी, चराठे, मोरे, वसोली, कानुली, तेरवण, इसापूर, भेकुर्ली, बावळट आदी सुमारे ४० गावचे मानकरी व जाणकार ग्रामस्थ उपस्थित राहतात. चौकुळ येथील स्नेहमेळ्यास मोठ्या संखेने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष पंढरी राऊळ, उपाध्यक्ष अशोक गावडे, शिवराम राऊळ, हनुमंत सावंत, कृष्णा राऊळ, तातोबा गवस, गजानन गावडे, सुरेश गावडे, सोनू गावडे यांनी केले आहे.