''आपले बाबा'' पुरस्कारांचे 20 ला ऑनलाईन वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''आपले बाबा'' पुरस्कारांचे
20 ला ऑनलाईन वितरण
''आपले बाबा'' पुरस्कारांचे 20 ला ऑनलाईन वितरण

''आपले बाबा'' पुरस्कारांचे 20 ला ऑनलाईन वितरण

sakal_logo
By

टीपः swt१५२५.jpg मध्ये फोटो आहे.
डॉ. मिलिंद शेजवळ, डॉ. श्रीकांत धारपवार

''आपले बाबा'' पुरस्कारांचे
२० ला ऑनलाईन वितरण
तळेरे : कणकवली येथील सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान व सिंधुवैभव साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ''आपले बाबा'' या साहित्य पुरस्कारांचे वितरण सोमवारी (ता. २०) प्रसिद्ध साहित्यिका ''आयदान''कार उर्मिला पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन करण्यात येणार आहे. डॉ. श्रीकांत धारपवार व डॉ. मिलिंद शेजवळ यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चवदार तळे पाणी सत्याग्रह दिनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
हा पुरस्कार डॉ. श्रीकांत धारपवार यांना ''तिमिरातूनी तेजाकडे'' या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीबाबतच्या पुस्तकासाठी व डॉ. मिलिंद शेजवळ यांच्या ''आंबेडकरी जलसा'' या नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीबद्दल पुस्तकाला प्राप्त झाला आहे. डॉ. धारपवार आणि डॉ. शेजवळ हे दोघे मुंबई केइम हॉस्पिटलचे माजी विद्यार्थी आहेत. या कार्यक्रमात सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान आणि सिंधवैभव साहित्य समूह, सिंधुदुर्गचे शुभांगी पवार, स्नेहा राणे-सरंगले तसेच डॉ. सतीश पवार सहभागी होणार आहेत.

मालवणात भाजपतर्फे उद्या
बिस्किटे बनविणे प्रशिक्षण
मालवण : माजी खासदार भाजपाचे युवा नेते नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. १७) दुपारी ३ वाजता दैवज्ञ भवन येथे येथे सर्वांसाठी मोफत (कुकीज) वेगवेगळी बिस्किटे बनविणे व (मॉकटेल) वेगवेगळी सरबत बनविण्याचे प्रशिक्षण भाजपा मालवणतर्फे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी दिली.
या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व सराव करून घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर्यटनाला आवश्यक असणाऱ्या नावीन्यपूर्ण व्यवसायाची माहिती देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केनवडेकर यांनी केले आहे.