
पर्यटकांच्या मोटारीची बांद्यात डंपरला धडक
89283
बांदा ः अपघातग्रस्त मोटार. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
पर्यटकांच्या मोटारीची
बांद्यात डंपरला धडक
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः दोडामार्ग येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या मोटारीने येथील कट्टा कॉर्नर चौकात डंपरला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. यात मोटारीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. तडजोडीने प्रकरण मिटविण्यात आल्याने बांदा पोलिसांत तक्रार दाखल नाही. हा अपघात आज दुपारी दोनच्या सुमारास घडला. अपघातग्रस्त मोटार दोडामार्ग येथून सावंतवाडीच्या दिशेने जात होती. त्याचवेळी डंपर गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने जात होता. मोटार चालकाने डंपरच्या पाठीमागील बाजूकडून धडक दिली. यात मोटारीचे नुकसान झाले. आतील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.