टॅलेंट परीक्षेत निधी प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टॅलेंट परीक्षेत निधी प्रथम
टॅलेंट परीक्षेत निधी प्रथम

टॅलेंट परीक्षेत निधी प्रथम

sakal_logo
By

rat१५१२.txt

बातमी क्र.. १२ (संक्षिप्त)
ओळी
- rat१५p३.jpg-
८९१९७
रत्नागिरी ः रत्नागिरी टॅलेंट परीक्षेत निधी मावळंकरला प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शिक्षकवर्गाकडून अभिनंदन करण्यात आले.
-
टॅलेंट परीक्षेत निधी मावळंकर प्रथम

रत्नागिरी ः जिल्हा परिषदेच्यावतीने यावर्षी प्रथमच शालेय गुणवत्ता वाढीसाठी चौथी व सातवीसाठी रत्नागिरी टॅलेंट परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेमध्ये चौथीमधून जिल्हा परिषद सरस्वती विद्यामंदिर खानू नं. १ शाळेची निधी मावळंकर हिने रत्नागिरी तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल विद्यार्थिनी निधी मावळंकर व मार्गदर्शक शिक्षक विष्णू घोळवे यांचे तसेच शाळेतील सहकारी शिक्षक संजय शेलार, दत्तात्रय दरडी, स्मिता जाधव तसेच मुख्याध्यापक प्रतिमा सरफरे यांचे अभिनंदन होत आहे. यामध्ये प्रामुख्याने शालेय व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ, खानू युवा मंच, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे आदींनी अभिनंदन केले.
-
बहुउद्देशीय सभागृहासाठी निधी मंजूर

लांजा ः निधीअभावी रखडलेल्या लांजा येथील बहुउद्देशीय सभागृहासाठी लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांच्या माध्यमातून २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती लांजा नगरपंचायत मधील नगरसेवक स्वरूप गुरव यांनी दिली. लांजा शहराच्या हायस्कूलसारख्या मध्यवर्ती ठिकाणी लांजा नगरपंचायतीच्या माध्यमातून ५ वर्षांपूर्वी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन करून सभागृह बांधण्यात आले होते; परंतु या सभागृहातील फर्निचर व्यवस्था तसेच लाईट व्यवस्था यांच्या अभावामुळे हे सभागृह गेले ५ वर्ष बांधून बंद अवस्थेत होते. ही बाब स्थानिक आमदार साळवी यांच्या निदर्शनास येताच २ वर्षांपूर्वी या सभागृहातील फर्निचर व लाईट व्यवस्था तसेच सुशोभीकरणासह कंपाउंड वॉलसाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले. साळवी यांनी या कामी विशेष मेहनत घेतली. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच काम पूर्ण होऊन सभागृह सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

--
प्राची, उझमा, तंझीलाचा गौरव

गुहागर ः खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाकडून राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आधुनिक तंत्रज्ञानाशी परिचय व्हावा यासाठी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खेड कॉलेजचे भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. अमोल पाटील उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सरपोतदार पी.एस. व जी. बी. सानप तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन त्यांनी स्वतः तयार केलेले पीपीटी प्रेझेंटेशन उपस्थित सादर केले. त्याचे परीक्षण करून डॉ. पाटील यांनी उत्कृष्ट असे तीन क्रमांक काढले. त्यात अनुक्रमे प्राची कदम, उझमा काझी, तंझीला मालगुंडकर या विद्यार्थ्यांनी मिळवला. या विद्यार्थिनींना डॉ. पाटील, सानप यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्यने विद्यार्थी उपस्थित होते.
-

फोटो
- RATCHL१५२.JPG ः
८९२१९
चिपळूण ः उपविजेत्या संघासोबत प्राचार्य संजय वरेकर आणि सहकारी.

कबड्डी स्पर्धेत सती विद्यालयाचे यश

चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयाचा संघ डेरवण येथील एस. व्ही. जे सिटी क्रीडा संकुलात झालेल्या कबड्डी स्पर्धेत उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रणित चिवेलकर यास चषक देऊन सन्मानित करण्यात आले. डेरवण युथ गेम्स २०२३ मध्ये विविध क्रीडाप्रकारातील अटीतटीचे सामने झाले. यामध्ये किशोरवयीन गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. या उपविजेत्या संघास १५ हजार रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात आले. संघातील सर्व खेळाडू व मार्गदर्शन क्रीडाशिक्षक महेश सावंत, विनय गोठणकर, प्रशांत मोरे, संतोष काजरोळकर, अनंत डिके यांचे लाभले. आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, शांताराम खानविलकर, महेश महाडिक, संजय वरेकर, अमर भाट यांनी अभिनंदन केले.
-
फोटो
- RATCHL१५३.JPG ः
८९२२०
चिपळूण ः तुषार खताते यांचा सत्कार करताना शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी.

युवासेनेच्या लोटे विभाग अधिकारीपदी तुषार खताते

चिपळूण ः उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेनेच्या लोटे विभाग अधिकारीपदी तुषार खताते यांची नियुक्ती करण्यात आली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या उपस्थितीत खतातेंची निवड झाली. लोटे गटात युवासेना मजबूत करण्याचा मनोदय खताते यांनी व्यक्त केला. या वेळी युवासेना सचिव राकेश सागवेकर, सरपंच संतोष ठसाळे, मच्छिंद्र गोवळकर, चेतन सागवेकर, प्रवीण काते, किरण ठसाळे, राजू मोगरे, दिनेश पवार, भूषण काते, सुमित चव्हाण, अनिकेत काते, नीलेश धपासे, नीलेश कलमकर यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे पदधिकारी उपस्थित होते.