उड्डाणपुलाच्या जमीन अधिग्रहणास विरोध उड्डाणपुलाच्या जमीन अधिग्रहणास विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उड्डाणपुलाच्या जमीन अधिग्रहणास विरोध
उड्डाणपुलाच्या जमीन अधिग्रहणास विरोध
उड्डाणपुलाच्या जमीन अधिग्रहणास विरोध उड्डाणपुलाच्या जमीन अधिग्रहणास विरोध

उड्डाणपुलाच्या जमीन अधिग्रहणास विरोध उड्डाणपुलाच्या जमीन अधिग्रहणास विरोध

sakal_logo
By

89314
सावंतवाडी ः बांदा ग्रामस्थांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना जाब विचारला.

उड्डाणपुलाच्या जमीन अधिग्रहणास विरोध

बांद्यातील प्रश्न; एकाच बाजूने सर्व्हे केल्याचा आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः बांदा येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या जागेसाठी भूमिअभिलेख कार्यालयाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जमीन अधिग्रहण करणे गरजेचे असताना एका बाजूनेच केल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला. याबाबत रस्ते महामार्गाच्या अधिकाऱ्यांना घेराओ घालत जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी यात आपला दोष नसून भूमिअभिलेख कार्यालयाने जसा सर्व्हे केला, तसाच मार्ग होईल, असे स्पष्ट केले.
बांदा येथे नव्या गोवा-मुंबई महामार्गावर उड्डाणपूल होऊ घातला आहे. या उड्डाणपुलाची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे; मात्र हे काम सुरू होण्यापूर्वीच स्थानिकांनी त्याला आडकाठी केली आहे. या उड्डाणपुलासाठी जी जागा अधिग्रहण करण्यात आली, त्यात एका बाजूनेच जास्तीत जास्तची जागा जात असल्याचा आक्षेप स्थानिकांनी घेतला आहे. उड्डाणपूल करायचा असेल तर दोन्ही बाजूंनी समान जागा अधिग्रहण करा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. याबाबत ग्रामस्थांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आपण जागा अधिग्रहण करत नाही, जागा अधिग्रहण करण्याचे काम भूमिअभिलेख करून देत असते. त्याप्रमाणे त्यांनी जागा अधिग्रहण करून आम्हाला दिली असून त्यावर आता काम सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले; मात्र ग्रामस्थांनी प्रक्रियेला आक्षेप घेतला असून जोपर्यंत स्थानिकांचे समाधान होत नाही, तोपर्यंत काम सुरू करण्यात येऊ नये, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगराध्यक्ष परब, हुसेन मकानदार, आसिफ शेख, बाळू सावंत आदी उपस्थित होते.