बापर्डेतील दुहेरी खूनप्रकरणी
संशयितास पोलिस कोठडी

बापर्डेतील दुहेरी खूनप्रकरणी संशयितास पोलिस कोठडी

बापर्डेतील दुहेरी खूनप्रकरणी
संशयितास पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १५ ः तालुक्यातील बापर्डे-बौद्धवाडी येथील दुहेरी खून प्रकरणातील संशयित भारत मुरारी सकपाळ (वय ४९) याला येथील पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (ता. १७) पोलिस कोडठी सुनावली. संशयिताने जेवण खाणे देत नसल्याच्या रागातून आपला मोठा भाऊ महेंद्र सकपाळ (वय ५६) आणि वृद्ध आई शोभा सकपाळ (वय ७०) यांच्या डोक्यासह शरीरावर इतरत्र दांड्याने मारहाण करून जिवे मारले. याप्रकरणी येथील पोलिसांनी संशयितावर खुनाचा गुन्हा नोंदविला होता.
याबाबत पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बापर्डे-बौद्धवाडी भागात राहणाऱ्‍या सकपाळ कुटुंबात ही घटना घडली. संशयिताने वयोवृद्ध आई आणि मोठा भाऊ यांना मारहाण केल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित म्हणून पोलिसांनी भारत सकपाळ याला ताब्यात घेतले. पोलिसांनी मारहाणीसाठी वापरलेला दांडाही ताब्यात घेतला. संशयिताला येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. देवगड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com