आगीच्या घटनास्थळाला आमदार साळवींची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगीच्या घटनास्थळाला आमदार साळवींची भेट
आगीच्या घटनास्थळाला आमदार साळवींची भेट

आगीच्या घटनास्थळाला आमदार साळवींची भेट

sakal_logo
By

rat१५३३.txt


rat१५p३०.jpg ः
८९२९०
राजापूर ः आपघातग्रस्तांशी संवाद साधताना आमदार राजन साळवी.


आगीच्या घटनास्थळी आमदार साळवींची भेट

राजापूर, ता. १५ ः मुंबई मालाड येथील झोपडपट्टीमधील भीषण आगीच्या घटनास्थळाला आमदार राजन साळवी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या आगीमध्ये मालाड येथे राहणाऱ्‍या राजापूर मतदार संघातील अनेक आपद्ग्रस्तांचा समावेश असून त्यांच्याशीही आमदार साळवी यांनी संवाद साधत धीर दिला. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, तहसीलदार विनोद धोत्रे यांच्याशी संवाद साधत आपद्ग्रस्तांना मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या.
या वेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड, आप्पा पाडाचे उपविभागप्रमुख प्रदीप निकम, राजापूर तालुका युवाधिकारी संदेश मिठारी, प्रवीण शेट्ये, सहकारचे सुधीर मोरे, विद्यार्थीसेनेचे सुशांत पांचाळ, रघुनाथ पांचाळ आदी उपस्थित होते.
मुंबई मालाड आप्पापाडा येथील झोपडपट्टीमध्ये नुकतीच आग लागल्याची घटना घडली होती. या आगीमध्ये सुमारे साडेतीन हजाराहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या तर या झोपड्यांमध्ये राहणारी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यामध्ये राजापूर मतदार संघातील मात्र, सद्यःस्थितीमध्ये मालाड येथे राहत असलेल्या अनेक कुटुंबांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली त्या ठिकाणाला आमदार साळवी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.