आज रत्नागिरी शहरात आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज रत्नागिरी शहरात आगमन
आज रत्नागिरी शहरात आगमन

आज रत्नागिरी शहरात आगमन

sakal_logo
By

rat१५p३१.jpg-
८९२९१
माता सुदीक्षा

माता सुदीक्षा आज रत्नागिरीत
रत्नागिरी, ता. १५ ः निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांची मानव कल्याणार्थ प्रचारयात्रा उद्या (ता. १६) रत्नागिरी शहरामध्ये येत आहे. यामुळे सर्व संत निरंकारी परिवारामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्त या संत समागमाच्या तयारीला लागले आहेत. संत समागम कार्यक्रम उद्या सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उद्यमनगर येथील चंपक मैदानावर होणार असल्याची माहिती चिपळूण विभागाचे प्रभारी प्रकाश म्हात्रे यांनी दिली.
या प्रचारयात्रेचा मूळ उद्देश ब्रह्मज्ञानाद्वारे समाजातील अज्ञानाचा अंधकार मिटवणे तसेच भ्रम, रूढी, अंधश्रद्धा यांपासून जनजागृती करणे, माणसांच्या मनातील वैर, द्वेषाच्या भिंती दूर करून एकत्व, विश्वबंधुत्व, प्रेम व बंधुभाव यांसारख्या मानवी मूल्यांची स्थापना करणे हा आहे. १९२९ पासून सुरू झालेले हे विश्वव्यापक संत निरंकारी मिशन मानवता आणि विश्वबंधुत्वाचे मिशन असून सर्व जाती, धर्म संप्रदायासाठी खुले व्यासपीठ आहे.
सद्गुरू माता सुदीक्षा महाराज यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या संत समागमाला रत्नागिरीसह मुंबई, रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व गोवा राज्यातून हजारोच्या संख्येने भक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती मंडळाद्वारे देण्यात आली. या कार्यक्रमात पोहोचून दिव्य संदेश प्राप्त करत आत्मिक जीवनाचे कल्याण करावे आणि आनंदमयी जीवनप्रवासाचे लाभार्थी बनावे, असे आवाहन निरंकारी मिशनने केले आहे.
कार्यक्रमासाठी मंडप, स्वच्छता अशी कामे गेल्या १५ दिवसांपासून निरंकारी सेवादल बंधू-भगिनी व भक्तांद्वारे सुरू होती. आता कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमात ब्रह्मज्ञान व सद्गुरूंच्या दिव्य संदेशाचा लाभ घेण्यासाठी भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.