
चिरे वाहणारा ट्रक अणुस्कुरा घाटात कोसळला
rat१५३६.txt
बातमी क्र..३६ ( पान ३ साठी)
rat१५p३६.jpg ः
८९३१२
राजापूर ः उलटलेला ट्रक.
चिरे वाहणारा ट्रक अणुस्कुरा घाटात कोसळला
राजापूर, ता. १५ ः राजापुरातून अणुस्कुरा येथे चिरे घेऊन जाणारा ट्रक अणुस्कुरा घाटातील दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रकचालकाने वेळीच गाडीबाहेर उडी घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजापुरातून चिरे घेऊन ट्रक अणुस्कुरा येथे जात होता. चिरे वाहतूक करत असलेला हा ट्रक अणुस्कुरा घाटात आला असता ट्रकमध्ये अचानक बिघाड होऊन तो घाट उतारावरून मागे येत थेट दरीत कोसळला. ट्रक दरीत कोसळण्यापूर्वीच चालकाने गाडीबाहेर उडी घेतल्याचे त्या ठिकाणी रस्त्याचे काम करणाऱ्या कामगारांनी सांगितले. या अपघातामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे; मात्र कोणालाही दुखापत झालेली नाही. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती.