मोबाईल शॉपी फोडणाऱ्या दोघाना 9 महिने सक्तमजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल शॉपी फोडणाऱ्या दोघाना 9 महिने सक्तमजुरी
मोबाईल शॉपी फोडणाऱ्या दोघाना 9 महिने सक्तमजुरी

मोबाईल शॉपी फोडणाऱ्या दोघाना 9 महिने सक्तमजुरी

sakal_logo
By

rat१५३७. txt

मोबाईल शॉपी फोडणाऱ्या दोघांना सक्तमजुरी

आठवडा बाजार येथील प्रकार ः प्रत्येकी ३ हजार दंड

रत्नागिरी, ता. १५ ः शहरातील आठवडाबाजार येथील मोबाईल शॉपी फोडून रोख रक्कमेसह ११ लाख किमतीच्या मोबाईल संच चोरी करणाऱ्या दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले. त्याना ९ महिने सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी ३ हजार दंड सुनावला. नूरमहमद दिलमहमद खान (वय २२) व आलमगीर शफीक वागळे (वय २६) अशी त्याची नावे आहेत. हा प्रकार १२ ते १३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्टच्या रात्री पोलिस शहरात गस्त घालत होते. त्याचवेळी संशयितांनी आठवडा बाजार येथील एस. एस. कम्युनिकेशन या मोबाईल शॉपीचे शटर उचकटून आत प्रवेश केला. आतील मुद्देमाल घेऊन जात असताना गस्ती पथकातील पोलिस वैभव नागवेकर आणि सहकारी यांना एका रिक्षाचालकाने माहिती दिली की, मोबाईल दुकानाच्या पुढे दोन तरुण संशयितरित्या आहेत. त्यांनी दुकान फोडले असावे, असा अंदाज आहे. याबाबत पोलिसांना खबर मिळताच गस्ती पथकातील पोलिस नागवेकर व त्यांचे सहकारी आठवडा बाजार येथे दाखल झाले. त्या वेळी त्यातील संशयित आलमगीर वागळे पळून गेला; मात्र नूरमहमद खान पोलिसांच्या हाती लागला.

या प्रकरणी मोबाईल दुकान मालक अमोल डोंगरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दोघांनाही अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. आज या खटल्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे ४ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. या गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल एस. एस. कम्युनिकेशचे मालक अमोल डोंगरे यांना परत करण्यात आला आहे.
---