
फणसगाव महाविद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
swt167.jpg
L89409
फणसगावः महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिला विकास कक्षामार्फत कर्तृत्तवान महिलांचा सन्मान करण्यात आला. (छायाचित्र : एन. पावसकर)
फणसगाव महाविद्यालयात
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १६ : फणसगाव शिक्षण संस्था मुंबई संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय, फणसगाव येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला विकास कक्ष आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, फणसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व विद्यार्थिनींची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास माध्यमिक विद्यालय फणसगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अरुंधती गोखले, महाविद्यालयाच्या प्राध्यापिका, त्याचप्रमाणे फणसगाव आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका तन्वी नांदोस्कर, श्रीमती जाधव यांचा महिला विकास कक्षामार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी फणसगाव संस्थेचे कोषाध्यक्ष गंगाधर नारकर, महाविद्यालयाचे प्रशासकीय विभाग प्रमुख आशिष ढेकणे, फणसगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अरुंधती गोखले, महाविद्यालयाच्या प्राचार्या अनुश्री नारकर, प्राध्यापिका ज्योत्स्ना कदम, सुचिता चव्हाण, जान्हवी नारकर, केतकी पारकर, ग्रंथपाल अनुराधा नारकर आदी उपस्थित होते. उदघाट्नपर भाषणात मुख्याध्यापिका अरुंधती गोखले यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या नारकर यांनी कार्यक्रम राबविण्याचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन सुचिता चव्हाण, प्रास्ताविक अनुराधा नारकर यांनी केले. आभार प्रा. कदम यांनी मानले.