विजयदुर्गच्या पर्यटनाला मिळणार झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजयदुर्गच्या पर्यटनाला मिळणार झळाळी
विजयदुर्गच्या पर्यटनाला मिळणार झळाळी

विजयदुर्गच्या पर्यटनाला मिळणार झळाळी

sakal_logo
By

swt168.jpg
89410
विजयदुर्गः येथील किल्ला.
swt169.jpg
L89411
विजयदुर्गः किल्ल्याची आतील तटबंदी.
(छायाचित्रेः संतोष कुळकर्णी)
swt1610.jpg
89402
विजयदुर्गः येथील बंदर रस्ता.
........................

विजयदुर्गच्या पर्यटनाला मिळणार झळाळी
‘इतिहासातून समृध्दीकडे’चा नाराः स्थानिकांसह ग्रामपंचायत, प्रेरणोत्सवचा पुढाकार
संतोष कुळकर्णीः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १६ः शिवप्रेमींचे श्रध्दास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा आणि मराठी साम्राज्याच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या तालुक्यातील किल्ले विजयदुर्गचा इतिहास अनुभवण्याबरोबरच न्याहळण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीकरिता नव्याने इतिहासाची पाने चाळण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती, विजयदुर्ग ग्रामपंचायत यांसह स्थानिक ग्रामस्थांचा यासाठी पुढाकार आहे. ‘इतिहासातून समृध्दीकडे’ असा नारा देत किल्ल्याबरोबरच गावाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी शिवप्रेमींनी शिवधनुष्य पेलण्याचा संकल्प केला आहे. शासन सोबत आले तर ठीक, अन्यथा असंख्य शिवभक्तांच्या माध्यमातून पर्यटकांसाठी काही सोयी करण्याचा संकल्प सोडला आहे.
किल्ले विजयदुर्गच्या अष्टशताब्दी महोत्सवानंतर पर्यटकांच्या नजरा याकडे वळल्या. उन्हाळी तसेच दिवाळी हंगामात असंख्य पर्यटक किल्ले विजयदुर्गला भेट देतात. त्यामुळे अलीकडील काही वर्षांत पर्यटकांचा विजयदुर्गकडे ओढा वाढला आहे. आता येणारे पर्यटक स्थानिक पातळीवर स्थिरावावेत तसेच त्यांनी आसपासच्या अनेक पर्यटनस्थळांना भेटी देऊन आनंद घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. विजयदुर्गमधील बंदर रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंगपासून अन्य सुविधा निर्माण करण्याचा मानस आहे. किल्ले विजयदुर्ग भागाला ''नेकलेस व्हू'' प्राप्त करण्याचा विचार आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, यापूर्वी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे अशा प्रकारची सूचना मांडली होती. ही संकल्पना कार्यान्वित करण्यासाठी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती प्रयत्नशील आहे. पार्किंगमध्ये सुसूत्रता आल्यावर एसटी, पर्यटकांच्या गाड्या यांची सोय होईल. स्थानिकांना यातून रोजगार मिळून त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचे साधन निर्माण होईल. किल्ले विजयदुर्ग म्हणजे शिवरायांचा इतिहास. याकडे आपुलकीने, श्रध्देने येणारे अनेकजण असल्याने इतिहासाकडून गाव समृध्दीकडे नेण्याचा प्रयत्न आहे. नवी पायवाट मळायला काही वर्षे जातील. यातून विजयदुर्गचा कायापालट काही वर्षांनी होईल. यासाठी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती आणि ग्रामपंचायत विजयदुर्ग यांच्याशी बैठक घेऊन आवाहन केले आहे. इतिहासाकडून समृध्दीकडे जाताना विजयदुर्गचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देता येईल का, यासाठी हालचाली सुरू आहेत. विजयदुर्गमधील पर्यटकाच्या संख्येत वाढ झाली पाहिजे, यासाठी सोयीसुविधांच्या दृष्टीने शासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग किंवा राज्य आणि केंद्राकडे सातत्याने पत्रव्यवहाराची भूमिका ठेवली जाणार आहे. शासनाला शक्य झाले नाही तर शिवप्रेमी पुढे येतील, अशीही संकल्पना ठेवली आहे.

चौकट
पर्यटकांसाठी अशा सुविधा उभारणार
किल्ले विजयदुर्ग पाहण्यासाठी असंख्य पर्यटक येतात. यातील काही ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुले किल्ला चढून जायला बघत नाहीत. तसेच ज्यांना पाण्याची भीती वाटते, असे पर्यटक बोटीतून सफर करीत नाहीत. अशांची किल्ल्याच्या पायथ्याशी राहून उनामुळे परवड होते. अशा पर्यटकांसाठी विसावा केंद्र, बैठक व्यवस्था करण्याचा मानस आहे. विसावा केंद्रात मोठा टेलीस्क्रीन लावून विजयदुर्ग किल्ल्याची तसेच परिसराच्या भौगोलिक रचनेची माहिती देणारा पट तयार करून दाखविला जाणार आहे. यासाठी चांगली ऑडिओ यंत्रणा ठेवली जाईल. यातून किल्ला बघू शकता न येणाऱ्यांना किल्ला पाहता येईल.
...................
चौकट
विजयदुर्ग पर्यटनाची व्याप्ती वाढणार
केवळ किल्ले विजयदुर्ग पाहून पर्यटक परतून जाऊ नयेत, तर दोन रात्र, तीन दिवस मुक्काम करून परिसरातील सर्व पर्यटनस्थळांचा आस्वाद घेऊन जावेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. विजयदुर्गला छत्रपती शिवाजी महाराज आणि आंग्रे यांच्या काळात आरमार बांधणीचा कारखाना होता, याची माहिती पर्यटक घेऊ शकतात. समुद्री वादळावेळी बोटी येऊन थांबू शकतात, अशी सुरक्षित बंदर म्हणून असलेली ओळख पर्यटकांना अनुभवता येईल. संपूर्ण किल्लाच समजून घ्यायला काही तास जातात. तसेच रामेश्‍वर मंदिर, दामले मळा, गिर्ये कोठारवाडीचा समुद्र किनारा पर्यटकांना पाहता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे.
.....................
कोट
swt1611.jpg
89403
राजीव परुळेकर

किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती पूर्णपणे समाजसेवी संस्था असल्याने पर्यटकांच्या सुविधांमधून अर्थार्जन करण्याचा हेतू असणार नाही. आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहोत. जग झपाट्याने बदलत असल्याचे मान्य आहे, तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढील पिढीसाठी जागृत ठेवण्याची गरज आहे. किल्ले विजयदुर्गचा इतिहास पर्यटकांना वारंवार सांगितला गेला पाहिजे, तरच पर्यटक येतील. येणार्‍या पर्यटकांना अतिशय विनम्रपणे सेवा पुरविण्याचा उद्देश आहे.
- राजीव परुळेकर, शिवप्रेमी, विजयदुर्ग-कोल्हापूर