
आंबोळगडकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था
rat१५१७.txt
बातमी क्र..१७ (पान ५ साठी)
rat१५p१६.jpg ः
८९२१६
राजापूर ः आंबोळगडला लाभलेला विस्तीर्ण समुद्र किनारा.
rat१५p१७.jpg ः
८९२१७
रस्त्याची झालेली दुरवस्था.
आंबोळगडकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था
प्रशासनाचे दुर्लक्ष ; पर्यटकांची पाठ ; ग्रामस्थांकडून नाराजी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः विस्तीर्ण आणि स्वच्छ समुद्रकिनारा, गगनगिरी महाराजांचा आश्रम अशा वैशिष्ट्यांमुळे पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर आलेल्या तालुक्यातील आंबोळगड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पार दुरवस्था झालेली आहे. आंबोळगडकडे जाणाऱ्या नाटे ते आंबोळगड या मार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास प्रवाशांसाठी नकोसा वाटत आहे.
या रस्त्याचे काम होण्यासाठी ग्रामस्थांकडून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला सातत्याने निवेदने देण्यात आली. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रवाशाच्यादृष्टीने सुस्थितीत होण्याचे भाग्य या रस्त्याच्या नशिबी येणार कधी, असा सवाल लोकांसह प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील आंबोळगड गावाला स्वच्छ, सुंदर आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याच्या जोडीला गगनगिरी महाराजांच्या प्रसिद्ध आश्रमासह अन्य मंदिरांमुळे या परिसराला धार्मिक अधिष्ठानही लाभले आहे. एकंदरीत, निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण लाभलेल्या आंबोळगड गावाकडे गेल्या काही वर्षापासून पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे. आंबोळगड गाव गेल्या काही वर्षामध्ये पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर आले आहे. मात्र, या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गावामध्ये येणाऱ्या विविध ठिकाणच्या पर्यटकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. ही स्थिती अनेक महिन्यांपासून राहिलेली आहे. त्यामुळे खड्डे चुकवत प्रवास करणे ग्रामस्थांसह पर्यटकांना नकोसे वाटत आहे.
या दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागाकडे यापूर्वी सातत्याने निवेदने देऊन लक्ष वेधण्यात आले आहे. त्याला गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विश्वास करंगुटकर यांनीही दुजोरा दिला. ग्रामस्थांच्या या निवेदनांना लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याच्या शब्दामध्ये ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर आलेल्या आंबोळगड गावाकडे जाणाऱ्या रस्ता सुस्थितीत होणार कधी, असा सवाल लोकांकडून उपस्थित केला जात आहे.
--