मनसे चषक पालेकोंड संघाने पटकावला

मनसे चषक पालेकोंड संघाने पटकावला

rat१६१२.txt

बातमी क्र.. १२ (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
- Ra१६p८.jpg ः
८९३९८
मंडणगड ः मनसे चषक अंतिम विजेता श्रीसतीदेवी क्रिकेट संघ व मान्यवर.
--
मनसे चषक पालेकोंड संघाने पटकावला

गुडेघर संघ उपविजेयी ; तुषार माळी उत्कृष्ट फलंदाज

मंडणगड, ता. १६ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिनानिमित्त केळशी फाटा येथे आयोजित मनसे चषक श्रीसतीदेवी क्रिकेट संघ पालेकोंड यांनी पटकावला. भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेघर संघाला उपविजेतापदावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांक शिवशंभो क्रिकेट संघ पालेगावने मिळवला.
मनसे चषक क्रिकेट स्पर्धेत २४ संघांचा सहभाग होता. या स्पर्धेचे उद्घाटन मनसे मंडणगड तालुकाध्यक्ष महेश कंचावडे यांच्या हस्ते झाले. अंतिम सामन्यात गुडेघर संघाने प्रथम फलंदाजी करताना १२ चेंडूत १६ धावांचे लक्ष्य पालेकोंड संघासमोर ठेवले. शेवटच्या चेंडूवर दोन धावा पटकावत पालेकोंड संघाने मनसे चषकावर आपले नाव कोरले तर तृतीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पालेगाव संघाने देव्हारे संघावर मात केली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अजय माळी, उत्कृष्ट फलंदाज तुषार माळी, उत्कृष्ट गोलंदाज अभिषेक जाधव व सामनावीर, मालिकावीर या दोन्ही पुरस्काराचा मानकरी सचिन माळी हा खेळाडू ठरला. विजेत्यांना रोख रक्कम, चषक, टी शर्ट, बॅट, सन्मानचिन्ह, मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेला मनसे संपर्क अध्यक्ष बबन महाडिक, महेश कंचावडे, राजेश कुळे, तेजस घस्ते, विनायक हंबीर, नवज्योत सिंग गौड, रवी पवार, अनिल गमरे, मंगेश दळवी, मांद्रे, पंकज दुर्गवले, सुहास मोडकले आदी मनसे सैनिकांची उपस्थिती लाभली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com