दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यासाठी 5 कोटीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यासाठी 5 कोटीची मागणी
दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यासाठी 5 कोटीची मागणी

दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यासाठी 5 कोटीची मागणी

sakal_logo
By

rat१६११.txt

बातमी क्र.. ११

दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यासाठी ५ कोटीची मागणी

आमदार शेखर निकम ः वाशिष्ट नदीतील गाळ उपसा

सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १६ ः चिपळूण शहरातील वाशिष्ट नदीतील गाळ उपसा करण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून कामही सुरू आहे; मात्र दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याला गती यावी याकरिता ५ कोटी निधीची मागणी आमदार शेखर निकम यांनी अधिवेशनामध्ये केली.
संगमेश्वर तालुक्यातील गडगडी प्रकल्पातील धरणांचे काम पूर्ण झाले असून त्यात पाणीसाठाही आहे. या धरणाची उंची वाढवू नये अशी मागणी आमदार निकम यांनी केली आहे. या धरणाच्या पाणीसाठ्यातून शेतकऱ्यांना खुल्या कालव्याने पाणीपुरवठा करू नये. कोकणात पावसाचे प्रमाण जास्त आहे. कालव्याच्या आजूबाजूला झाडे झुडपे तयार होऊन ती मातीने भरली जातात. त्यामुळे पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होतील. अशा वेळी ग्रॅव्हिटीने परिसरातील गावातील शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी देण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काजू, आंबा, नारळ, कोकम, केळी आशा मोठ्या बागा आहेत. पाणीपुरवठ्यासाठी त्यांच्याकडे कृषिपंप आहेत. तरीही कृषिपंप योजनेतून वगळून बिगर कृषिपंपासाठी (Ag Othar than) वीजबिल आकारले जात आहे. ही बिले भरमसाठ आकारली जातात. त्यामुळे येथील शेतकरी जादा वीजबिलात भरडला गेला आहे. तरी या पद्धतीने वीजबिल आकारणी बंद करून येथील शेतकऱ्यांना कृषिपंप योजनेत समाविष्ट करा, अशी मागणी त्यांनी केली.
-
इएसआयसी योजनेपासून कामगार वंचित
कर्मचारी राज्य विमा योजना ही कामगारांसाठीची सामाजिक सुरक्षा योजना आहे. राज्याच्या सध्या ४४३ जिल्ह्यांमध्ये पूर्णत: तर १५३ जिल्ह्यांमध्ये त्याची अंशतः अंमलबजावणी केली गेली आहे. १४८ जिल्हे इएसआय योजनेत समाविष्ट नाहीत. शासनाची कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत (ESIC) अधिसूचना असूनसुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात कामगारांसाठी इएसआयसीची रुग्णालये नाहीत तर खासगी रुग्णालय शासनाने इएसआयसीला संलग्न केलेली नाहीत. परिणामी, येथील कामगारांना योजनेचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे शासनाच्या योजनेपासून येथील कामगार वंचित राहत आहेत. कामगारांना लाभ मिळण्यासाठी रुग्णालये सुरू करावीत, अशी मागणी आमदार निकम यांनी केली.