पन्नास वर्षाचा संसार करणाऱ्यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पन्नास वर्षाचा संसार करणाऱ्यांचा सन्मान
पन्नास वर्षाचा संसार करणाऱ्यांचा सन्मान

पन्नास वर्षाचा संसार करणाऱ्यांचा सन्मान

sakal_logo
By

rat१६१७.txt

फोटो ओळी
-rat१६p३.jpg-
८९३८७
चिपळूण ः पन्नास वर्ष संसार करणाऱ्यांचा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सत्कार करण्यात आला.
-
पन्नास वर्षे सुखी संसार करणाऱ्यांचा सन्मान

ज्येष्ठ नागरिक संघ ः ज्येष्ठांसाठी ७ एप्रिलला चालण्याची स्पर्धा

चिपळूण, ता. १६ ः पन्नास वर्ष यशस्वी संसार केलेल्या आणि ७५ वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पोलिस निरीक्षक सुभाष शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला सुमारे ७० सदस्य उपस्थित होते.
चितळे मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक या वयातही उत्साही आणि आनंदी आहेत हे पाहून मलाही आनंद झाला. ज्येष्ठ नागरिकांकडून तरुणांनी स्फूर्ती घ्यायला हवी. त्यांना कोणतीही मदत लागल्यास आपण तयार आणि तत्पर आहोत. सदस्यांनी असा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल मी समाधानी आहे.
या कार्यक्रमानंतर माधव बाग या संस्थेच्या डॉ. राधा मोरे यांनी ज्येष्ठांसाठी ७ एप्रिलला जागतिक आरोग्यदिनी चालण्याची स्पर्धा आयोजित केली असल्याचे सांगितले. त्यापूर्वी ज्येष्ठांनी माधवबागेत येऊन आपल्या सर्व प्रकारच्या चाचण्या करून घ्याव्यात. या सर्व चाचण्या मोफत असून त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार किती अंतराच्या स्पर्धेत भाग घ्यावा, हे सुचवले जाईल. त्यासाठी नागरिकांनी एक अर्ज भरून द्यायचा आहे. तो ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात प्राप्त होईल, असे सांगितले. याच संस्थेचे डॉ. चंदनशिवे यांनीही याबाबत माहिती दिली. चितळे मंगल कार्यालयाचे मालक मोहनराव चितळे हे ज्येष्ठ नागरिक संघाला नेहमीच उत्तम सहकार्य करत असतात. गेली २० वर्षे त्यांनी संघाला सर्व कार्यक्रमांना आपले कार्यालय विनामोबदला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचाही सन्मान केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीला पेंडसे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष बांगी, कळंबटे, नंदू तांबे, गनी आणि अन्य सदस्यांनी मेहनत घेतली.