सावंतवाडी रुग्णालयात सोनोग्राफी यंत्रणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी रुग्णालयात सोनोग्राफी यंत्रणा
सावंतवाडी रुग्णालयात सोनोग्राफी यंत्रणा

सावंतवाडी रुग्णालयात सोनोग्राफी यंत्रणा

sakal_logo
By

सावंतवाडी रुग्णालयात सोनोग्राफी यंत्रणा
रुग्णांची सोय होणार; रजिस्ट्रेशन, तंत्रज्ञ उपलब्धतेनंतर सेवा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ः येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशिन उपलब्ध झाली आहे. मशिनचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तंत्रज्ञही लवकरात लवकर उपलब्ध करून ही सेवा रुग्णांना दिली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांची सोय होणार आहे. आता सोनोग्राफीसाठी रुग्णांना खासगी सेवा घ्यावी लागत आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशिन उपलब्ध नसल्याने तालुक्यातील रुग्णांना सोनोग्राफीसाठी खासगी रुग्णालयांत जावे लागत होते. शिवाय सोनोग्राफीसाठी एक ते दीड हजार रुपयेही मोजावे लागत होते. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा खर्च परवडणारा नव्हता. रुग्णालयात सर्वसामान्यांची सोनोग्राफीसाठी होणारी आर्थिक कुचंबणा लक्षात घेत ‘सामाजिक बांधिलकी’चे रवी जाधव व जीवन रक्षा प्रतिष्ठानचे राजू मसूरकर यांनी एक महिन्यापूर्वी सिव्हिल सर्जन डॉ. बी. एस. नागरगोजे यांची भेट घेऊन उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी विविध सोयी सुविधांबरोबरच सोनोग्राफी मशिन उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत येथील रुग्णालयात सोनोग्राफी मशिन उपलब्ध करून देण्यात आली.
या मशिनचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तंत्रज्ञही लवकरात लवकर उपलब्ध करून त्यानंतर ही सेवा रुग्णांना दिली जाणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच २० हजारच्या आत उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी तहसीलदारांकडून उत्पन्नाचा दाखला उपलब्ध झाल्यास अंध, अपंग, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद, एचआयव्ही, टी.बी., कॅन्सरग्रस्त, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू, चिकन गुनिया, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, गरोदर महिला, थायलेमिशिया अशा आजार असलेल्या रुग्णांसाठी सोनोग्राफी तपासणी सेवा मोफत मिळणार आहे. इतर रुग्णांसाठी ही सेवा २०० ते २५० रुपये एवढ्या माफक दरात उपलब्ध होणार आहे. सोनोग्राफी मशिनसाठी सिव्हिल सर्जन डॉ. नागरगोजे व जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांनी विशेष प्रयत्न केले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर व बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत त्यांनी यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल ‘सामाजिक बांधिलकी’च्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.