खेड-खेडमधील किल्ले रसाळगडाचे ''रूपडे'' पालटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-खेडमधील किल्ले रसाळगडाचे ''रूपडे'' पालटणार
खेड-खेडमधील किल्ले रसाळगडाचे ''रूपडे'' पालटणार

खेड-खेडमधील किल्ले रसाळगडाचे ''रूपडे'' पालटणार

sakal_logo
By

ग्राफीक लावावे.

फोटो ओळी
- rat१६p७.jpg - KOP२३L८९३९१ खेड येथील किल्ले रसाळगड.
- rat१६p१९.jpg - KOP२३L८९४३४ रसाळगडावरील झोलाई देवीचे मंदिर.
- rat१६p२०.jpg KOP२३L८९४३५ -किल्ले बांधताना दगड जोडण्यासाठी लागणारा चुना आणि इतर आवश्यक सामग्री एकत्रित करण्याचे यंत्र या गडावर पाहायला मिळते.
- rat१६p२१.jpg -KOP२३L८९४३६ किल्ल्यावर अशा अनेक तोफा आहेत.


किल्ले रसाळगडाचे पालटणार रुपडे
१४ कोटी ९१ लाखांची मान्यता; तटबंदी, बुरूजांच्या भिंती होणार मजबूत
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १६ ः खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला व शिवछत्रपतींच्या सुवर्णमयी इतिहासाचा साक्षीदार असलेला किल्ला रसाळगडाचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. किल्ले सुशोभिकरणासाठी राज्य शासनाकडून १४ कोटी ९१ लाख ४१ हजार ९४० रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी दिली.
पावसाळ्यातील भटकंतीसह ट्रेकर्सची पसंती असलेला किल्ले रसाळगड अलिकडे पर्यटनाचे नवे डेस्टिनेशन ठरू पाहत आहे; मात्र किल्ल्यावर जाण्यासाठी साधी पायवाटदेखील नाही. दगडामधूनच मुख्य किल्ल्याच्या आतील भागात जाता येते तर किल्ल्यावर पायाभूत सेवासुविधांचा अभाव आहे. काही ठिकाणी पडझड झाली असल्यामुळे किल्ल्याचे वैभव झाकोळले गेले आहे. मंजूर निधीतून शिव व गडकोटप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
निसर्गाच्या माऱ्यात किल्ल्यावरील धान्य कोठाराचेही नुकसान झाले आहे. तटाच्या भिंती, बुरूज काही ठिकाणी ढासळले आहेत. गडाला राज्य संरक्षित दर्जा प्राप्त असतानाही निधी नसल्याचे कारण पुढे करत या किल्ल्याचे सुशोभिकरणाचे काम रेंगाळले होते. या किल्ल्याच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे रामचंद्र आखाडे यांनी केली होती. अखेर किल्ले रसाळगडासाठी जतन-दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसे पत्र सहाय्यक संचालक पुरातत्व विभागाचे डॉ. विलास वाहणे यांनी कळवले आहे. त्यामुळे आगामी काळात किल्ले रसाळगडाचा कायापालट होणार आहे.

चौकट
गडावरून दिसणारे सौंदर्य अदभूत
पर्यटनासाठी रसाळगड हा उत्तम पर्याय आहे. पावसाळ्यात गडाचे सौंदर्य खुलून दिसते. दाट धुके, हिरवळ अन् गडाच्या मध्यावरून पूर्वेकडे सह्याद्रीची लांबवर पसरलेली रांग, पश्चिमेकडे पालगड, दक्षिणेकडे जगबुडी नदीचे खोरे, मधु मकरंद गड असा परिसर न्याहाळण्यासाठी अनेक पर्यटकांची पावले या किल्ल्याकडे वळतात.

चौकट
धान्याची वखार, दगड जोडण्यासाठीचे यंत्र
या गडावर श्री झोलाई, वाघजाई देवी, तसेच श्री गणेशाच मंदिर आहे. मंदिरीच्या शेजारी २ तलाव आहेत आणि बरेच तलाव गडावर पाहायला मिळतात. पावसाळी हे तलाव व गडावरील दृश्य पाहण्याचा आनंद ट्रेकर्ससाठी पर्वणीच असे. गडावर शिवकालीन धान्याची वखार पाहायला मिळते. तसेच पूर्वी किल्ले बांधताना दगड जोडण्याकरिता लागणार चुना आणि इतर आवश्यक सामग्री एकत्रित करण्याचे यंत्रही बघायला मिळते.

चौकट
किल्ला कोणी बांधला याची नोंद नाही
हा किल्ला कोणी बांधला याची इतिहासात नोंद नाही. रसाळगड किल्ल्याचा ज्ञात इतिहास शिवरायांच्या काळापासून सुरू होतो. पहिला हा किल्ला जावळीच्या मोरेंच्या हद्दीत होता. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर १८१८ मध्ये किल्ला पेशव्यांच्या ताब्यातून ब्रिटिशांकडे गेला. ऐतिहासिक नोंदीनुसार १६ व्या शतकात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर पेशवे आणि इंग्रजांनी ताब्यात घेतला. ज्यांनी त्याचा लष्करी चौकी म्हणून वापर केला. आज हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या देखरेखीखाली आहे.

कोट
दुर्गप्रेमींची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर
किल्ले रसाळगडासाठी मंजूर झालेला निधी आणि त्यातून गडावर करण्यात येणारी कामे ही गडाला नवी झळाळी किंबहुना गतवैभव प्राप्त करून देणारी बाब आहे. यामुळे या किल्ल्यावर पर्यटकांची पावले वळून पर्यटनवाढीस मदत होणार आहे. याकरिता राज्य सरकारने भरीव प्रयत्न करण्याची गरज आहे
- रामचंद्र बाबू आखाडे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच