दोडामार्गात रस्त्यांसाठी कोट्यवधीचा निधी

दोडामार्गात रस्त्यांसाठी कोट्यवधीचा निधी

दोडामार्गात रस्त्यांसाठी कोट्यवधीचा निधी
शिवसेना तालुकाप्रमुखः विविध विकासकामांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १६ः नुकताच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे तालुक्यातील अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत. या निधीद्वारे ग्रामीण भागातील रस्ते व राज्य मार्ग सुसज्ज होणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी दिली.
येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गवस यांनी ही माहिती दिली. यावेळी उपतालुकाप्रमुख बाबाजी देसाई, उपतालुकाप्रमुख तिलकांचन गवस, मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, आंबडगाव सरपंच स्नेहा गवस, अरुण नाईक, भगवान गवस, आदी उपस्थित होते.
मंजुरीत कामे व त्यावर खर्च होणारा निधी पुढीलप्रमाणेः साटेली भेडशी-बोडदे-मांगेली-कर्नाटक हद्दीकडे जाणाऱ्या रस्त्याला आवश्यक तेथे संरक्षक भिंतीचे बांधकाम (एक कोटी), साटेली भेडशी-पिकुळे रस्त्याला संरक्षक भिंती (५० लाख), तिलारी-पाळये रस्त्यावरील पुलाचे बांधकाम (एक कोटी), झरे शेळपी बांबरवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण (४० लाख), मांगेली फणसवाडी देऊळवाडी कुसगेवाडी खोक्रल रस्ता सुधारणा व डांबरीकरण (दहा लाख), माटणे म्हावळुंगे रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण (१५ लाख), आयी तळेखोल रस्त्यावरील पुलाला जोडरस्ता (१ कोटी ५० लाख), गिरोडे झरेबांबर रस्ता सुधारणा व डांबरीकरण (३० लाख), दोडामार्ग आयी राज्यमार्ग ते आयी कुंभारवाडी रस्ता डांबरीकरण (३० लाख), कुडासे भरपालवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण (२० लाख), उगाडे कोळंबवाडी तळकट देऊळवाडी रस्ता (२५ लाख), कुंब्रल मुख्य रस्ता ते शिरवल रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण (२० लाख), उसप शाळेचीवाडी रस्ता डांबरीकरण (२० लाख) मोरगाव दलित वस्ती ते पवारवाडी ब्रह्मपुरी रस्ता (२५ लाख), घोटगे येळपयवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण (२० लाख), तिलारी-पाळये रस्ता डांबरीकरण (२० लाख), मेढे गावठाणवाडी नागनाथ मंदिर रस्ता डांबरीकरण (२० लाख), घोडटगेवाडी खालची भटवाडी-कोनाळकट्टा रस्ता डांबरीकरण (३० लाख), सासोली-गोवा हद्द रस्ता सुधारणा व डांबरीकरण (२५ लाख), दोडामार्ग-वीजघर राज्यमार्ग ते आंबेली देऊळवाडी रस्ता डांबरीकरण (२० लाख) असा भरघोस निधी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झाला. त्यामुळे भविष्यात दोडामार्ग तालुक्यातील सर्व रस्ते सुस्थितीत होणार असल्याची माहिती गवस यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com