मालवणात ''भगवा चषक'' स्पर्धेची धूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात ''भगवा चषक'' स्पर्धेची धूम
मालवणात ''भगवा चषक'' स्पर्धेची धूम

मालवणात ''भगवा चषक'' स्पर्धेची धूम

sakal_logo
By

swt१६२०.jpg
89475
मालवणः उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक स्पर्धेचे उद्घाटन आमदार वैभव नाईक, अनिल पाटणकर यांच्या उपस्थितीत झाले.

मालवणात ‘भगवा चषक’ स्पर्धेची धूम
राष्ट्रीय स्तर क्रिकेट स्पर्धाः शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने लाखो रुपये पारितोषिक रकमेच्या ''शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक'' या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या भव्य स्वरुपातील दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचा टोपीवाला बोर्डिंग मैदानावर आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मुंबईचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
स्पर्धेच्या निमित्ताने शिवसेना शाखा ते बोर्डिंग मैदानावर भव्य दुचाकी रॅली काढून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या भगवा चषकाच्या निमित्ताने शहरातील वातावरण भगवेमय झाले. १५ ते १९ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख उमेश मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दुचाकी रॅलीचा प्रारंभ झाला. शहरातून भव्य रॅली बोर्डिंग मैदानावर दाखल झाली. आमदार नाईक व मुंबईचे माजी नगरसेवक बेस्ट समिती चेअरमन पाटणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार नाईक यांनी फलंदाजी करत फटकेबाजी केली. खासदार विनायक राऊत यांनीही क्रिकेट स्पर्धेला उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी झाले आहेत. नामवंत आणि दिग्गज क्रिकेटपटूंचा सहभाग स्पर्धेत आहे. स्पर्धेतील विजेत्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक व ३ लाख रुपये, उपविजेता संघास भव्य चषक व १ लाख ५० हजार रुपये व वैयक्तिक स्तरावरील अन्य पारितोषिके असणार आहेत. खासदार राऊत, आमदार नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, बाबी जोगी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, बाबा सावंत, मंदार गावडे, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, पंकज सादये, अन्वय प्रभू, किरण वाळके, सेजल परब, शिल्पा खोत, संमेश परब, तपस्वी मयेकर, अमित भोगले, समीर लब्दे, विजय पालव, राजेश गावकर, बंडू चव्हाण, कमलाकर गावडे, प्रवीण लुडबे, भाऊ चव्हाण, रश्मीन रोगे, भाई कासवकर, आशू मयेकर, दर्शन म्हाडगुत, बाबू टेंबुलकर, विनायक परब, अक्षय रेवंडकर, उमेश चव्हाण, मनोज मोंडकर, यशवंत गावकर, महेश जावकर, उमेश मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, श्वेता सावंत, दीपा शिंदे, रश्मी परुळेकर, पूनम चव्हाण, निनाक्षी शिंदे, सोमनाथ माळकर, नरेश हुले, स्वप्नील आचरेकर, नंदू गवंडी, तृप्ती मयेकर, किशोर गावकर उपस्थित होते.