
खेळ पैठणीचा स्पर्धेत वैदेही पाटील प्रथम
swt1617.jpg
89457
नांदगावः खेळ पैठणीचा स्पर्धेतील विजेत्यांना गौरविताना मान्यवर.
खेळ पैठणीचा स्पर्धेत
वैदेही पाटील प्रथम
नांदगाव, ता. १६ः जागतिक महिला दिनानिमित्त नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम ग्रामपंचायत समोरील पटांगणात घेण्यात आला. या कार्यक्रमात गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये वैदेही पाटील, अस्मिता मोरये व स्नेहल परब यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. माजी सरपंच आनंद बापार्डेकर, हर्षदा वाळके, आफ्रोजा नावलेकर यांचा ही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे, ग्रामपंचायत सदस्या अक्षता खोत, गौरी परब, पूजा सावंत, नमिता मोरये, जैबा नावलेकर, रमिजान बटवाले, पत्रकार ऋषिकेश मोरजकर आदी उपस्थित होते. खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार उमेश परब यांनी केले.