Thur, June 1, 2023

कणकवली : संप शुकशुकाट
कणकवली : संप शुकशुकाट
Published on : 16 March 2023, 1:12 am
89481
शासकीय कार्यालयांत
संपामुळे शुकशुकाट
संपकरी मागणीवर ठाम; नागरिकांची गैरसोय
कणकवली, ता. १६ : जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपाचा आज तिसरा दिवस आहे. या संपात बहुतांश कर्मचारी सहभाग झाल्याने महसूल, नगरपंचायत, पंचायत समिती, कृषी आदी शासकीय कार्यालयांत शुकशुकाट होता.
दरम्यान संपात काही शिक्षकांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कणकवली शहरातील शाळा नं. १ सह तालुक्यातील अन्य पाच ठिकाणच्या शाळा सुरू होत्या. प्रांत, तहसीलदार, कृषी विभाग, नगरपंचायत, पंचायत समिती या कार्यालयांतील मात्र शंभर टक्के कर्मचारी संपात आहेत. त्यामुळे गेले तीन दिवस ही कार्यालये ओस पडल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे विविध प्रकारचे दाखले व इतर कामासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे.