कणकवली : साकव दुरूस्ती

कणकवली : साकव दुरूस्ती

८९४८८


साकव दुरुस्तीसाठी
१०० कोटीची तरतूद करा
वैभव नाईक; अधिवेशनात तारांकित प्रश्न
कणकवली, ता. १६ : सिंधुदुर्गातील गावे आणि वाड्या एकमेकांशी जोडण्यामध्ये साकवांची मुख्य भूमिका आहे. या साकव दुरूस्तीसाठी १०० कोटींची तरतूद करा अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी आज अधिवेशनामध्ये केली.
श्री.नाईक म्‍हणाले, ‘‘नवीन साकव बांधणीसाठी ३५ ते ४० लाख रूपयांचा खर्च येतो. त्‍यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी जातो. त्‍यामुळे नवीन साकव बांधणी होईपर्यंत, जुन्या साकवांची दुरूस्ती केली जावी. जुने साकव दुरूस्तीसाठी पाच ते दहा लाख रूपयांचा खर्च येतो. नवीन साकव बांधून होईपर्यंत जुन्या साकवांचा नागरिकांच्या ये-जा करण्यासाठी वापर होऊ शकतो.’’
श्री. नाईक महणाले, ‘‘जिल्हा नियोजन मध्ये नवीन साकवांसाठी निधी मंजूर केला आहे. गतवर्षी तत्कालीन वित्त मंत्री अजित पवार यांनी नवीन साकवांच्या खर्चासाठी ३५ लाख असलेली मर्यादा ६५ लाखांपर्यत वाढविली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साकवांच्या दुरुस्तीसाठी १०० कोटी निधीची तरतूद केली तर अनेक नादुरुस्त असलेले साकव सुस्थितीत करता येतील. त्‍याचा पावसाळ्याच्या कालावधीत ये-जा करण्यासाठी नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com