राजापूरवर यावर्षीही पाणीटंचाईचे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूरवर यावर्षीही पाणीटंचाईचे संकट
राजापूरवर यावर्षीही पाणीटंचाईचे संकट

राजापूरवर यावर्षीही पाणीटंचाईचे संकट

sakal_logo
By

rat१६१०.txt

बातमी क्र..१० (पान २ साठीमेन)

फोटो ओळी
-rat१६p६.jpg ः
८९३९०
राजापूर ः पाण्याअभावी खडखडाट झालेले सायबाचे धरण.
--
राजापूरवर यावर्षीही पाणीटंचाईचे संकट

पाडव्यानंतर पाणीकपात ; आता ४५ मिनिटेच मिळणार पाणी

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः वाढते उष्ण तापमान, वातारवणातील बदल यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍या कोदवली येथील धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे आता राजापूरवर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामध्ये गुढीपाडव्यानंतर (ता. २२) पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करून आता एक तासाऐवजी पाऊण तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर पालिका प्रशासनाने घेतला आहे. ही माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.
दरम्यान, मुख्याधिकारी भोसले यांनी आज कोदवली धरण परिसरातील पाणीसाठ्याची पाहणी केली आहे. वाढते तापमान व यामुळे भूगर्भातील कमी होणारी पाण्याची पातळी लक्षात घेता पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानातील उष्मा वाढू लागला असून, त्यातून जलस्त्रोत कमी होऊ लागले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍या सायबाच्या धरणातील पाणीसाठाही आता घटला आहे. कोदवली धरणालगत नव्याने बांधण्यात येत असलेल्या धरणाचे कामही आता निधीअभावी अपूर्ण आहे. त्यामुळे शहरावर तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या टंचाईचा सामना करण्याचे पालिका प्रशासनाकडून आतापासूनच जोरदार तयारी करण्यात येत आहे. यामध्ये टंचाईच्याकाळात शहरवासीयांना जास्तीत जास्त नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. कोदवली धरणाच्या वरील बाजूला दोन बंधारे बांधून पाणी साठवण्यात आले असून हा पाणीसाठा धरणात सोडून पाणीपुरवठा केला जाणार आहे; मात्र तो पुरेसा नाही. यासाठी गुढीपाडव्यानंतर आत्ताच्या एक तास होत असलेल्या पाणीपुरवठ्यात १५ मिनिटांची कपात करून पाऊण तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. उपलब्ध पाणीसाठ्यावर यावर्षी टँकर न वापरता पाणीपुरवठा सुरळीत करता येतो का यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
-
मे महिन्यात उपसणार गाळ
नाम फाउंडेशनच्या सहकार्याने कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाचे काम सुरू आहे. त्याच्या जोडीने कोदवली धरणातील गाळ साठ्याचाही उपसा केला जाणार आहे. मात्र, धरणातील पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतर हे गाळ उपशाचे काम करणे शक्य असून मे महिन्यात या धरणात साचलेला गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले.