
राजापूर-राजापुरात धार्मिक, पर्यटनस्थळांच्या फलकाचे अनावरण
-rat१६p२४.jpg ः KOP२३L८९४६५ राजापूर ः माहिती फलकाचे अनावरण करताना सरपंच राजप्रसाद राऊत आणि सहकारी, मंडळाचे पदाधिकारी.
---------------
धार्मिक, पर्यटनस्थळांच्या
फलकाचे राजापुरात अनावरण
राजापूर, ता. १६ ः धार्मिक आणि विविध सामाजिक उपक्रम राबवणार्या तालुक्यातील जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने जैतापूर एसटी स्टँड येथे एसटी वेळापत्रकासह या परिसरातील विविध धार्मिक आणि पर्यटनस्थळांची लोकांना माहिती व्हावी या दृष्टीने माहिती फलकाची उभारणी करण्यात आली आहे. त्याचे जैतापूरचे सरपंच राजप्रसाद राऊत, मंडळाचे संस्थापकीय सचिव, सल्लागार, माजी सरपंच गिरीश करगुटकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
माहिती फलक अनावरण कार्यक्रमप्रसंगी गणेशेत्सव मंडळाचे अध्यक्ष राकेश दांडेकर, सचिव सुनील करंगुटकर, खजिनदार वासुदेव नारकर, उपसरपंच मिनल मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडविलकर, आराध्या मांजरेकर, मुंबई सांताक्रुज येथील शाखाप्रमुख संदीप शिवलकर, निवृत्त शिक्षक प्रियंका नार्वेकर, पद्मनाभ मांजरेकर, प्रसाद मांजरेकर, शैलजा मांजरेकर, मंगल मयेकर, रेशम लाड, श्रीकृष्ण राऊत, महेश नारकर, हर्षद मांजरेकर, साहिल रांबाडे, नीलेश पालकर, समीर पावसकर, सुहास भोसले, सचिन पवार, कांता पावसकर, अरविंद मांजरेकर, रमेश मांजरेकर, सुनील बावकर, उमेश होलम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावर्षी मंडळाच्या वतीने जैतापूर एसटी स्टँड येथे प्रवाशांना बसण्यासाठी ३ सिमेंटच्या बेंचेस, नाटे पोलिस ठाणे येथे सिमेंट बेंचेस बसवून सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. आता या जैतापूर एसटी स्टँड येथे एसटी वेळापत्रकासह या परिसरातील विविध धार्मिक आणि पर्यटनस्थळाची लोकांना माहिती व्हावी या दृष्टीने माहिती फलकाची उभारणी करण्यात आली आहे. या फलकावरील गाड्यांचे वेळापत्रक आणि पर्यटनस्थळांच्या माहितीमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात जा-ये करणारे प्रवाशी, पर्यटकांना विविध प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे.