कोकणासाठी सोळाशे कोटी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणासाठी सोळाशे कोटी द्या
कोकणासाठी सोळाशे कोटी द्या

कोकणासाठी सोळाशे कोटी द्या

sakal_logo
By

swt१६२२.jpg
L89490
रवींद्र चव्हाण

कोकणासाठी सोळाशे कोटी द्या
बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती; केंद्रीयमंत्री गडकरींकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ः कोकणसह राज्यातील ओढे, नाल्यांवरील साकवांच्या ठिकाणी क्राँकिटीकरणाच्या माध्यमातून नव्याने छोटे पूल बांधण्यासाठी व दुरुस्तीसाठी केंद्राच्या ''सेंट्रल रिझर्व्ह'' फंडामधून सुमारे १६०० कोटीचा निधी उपलब्ध करून घेण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विनंती करण्यात येत आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर कोकणासह राज्यात छोटे पूल लवकरात बांधण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात राजन साळवी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील १४९९ साकवांसह राज्यात २७०७ साकव नव्याने बांधणी करण्यात येणार आहेत. यामधील काही साकवांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. साकवांच्या ठिकाणी छोटे पूल बांधण्यात येतील. कोकणात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. यामुळे गावागावांचा संपर्क तुटतो. गावागावामध्ये जाण्यासाठी ओढे व नाल्यांवर छोटे-छोटे साकव बांधण्यात येतात; परंतु पावसामुळे हे साकव नादुरुस्त झाले आहेत. कोकणासह राज्यात अन्यत्र छोट्या पुलांची आवश्यकता आहे. या सर्व पुलांच्या बांधणीसाठी व दुरुस्तीसाठी सुमारे १६०० कोटीची आवश्यकता आहे. त्यामुळे केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या मंत्रालयाकडे सीआरएफचा निधी उपलब्ध होण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील जावडे पाटकरवाडी येथील लाकडी साकवाची बांधणी करण्यासाठी सुमारे ३० लाख खर्च अपेक्षित आहे. या कामाचा प्रस्ताव रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या मंजुरीकडे पाठविण्यात आला आहे. हा निधी प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर पाटकरवाडी येथील लाकडी साकवाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री चव्हाण यांनी दिले.