
निधन वार्ता
माजी सैनिक राजाराम कदम यांचे निधन
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील ग्रामस्थ आणि माजी सैनिक राजाराम गणपत कदम (वय ८१) यांचे सोमवारी (ता. १३) हृदयविकाराने निधन झाले. राजाराम कदम हे १९६२ ला देशाच्या सैन्यदलात भरती झाले होते. सलग २२ वर्षे सैनिक म्हणून त्यांनी उत्तम सेवा बजावली. या कालावधीत त्यांना विविध पदकेही प्राप्त झाली होती. १९८४ ला सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर कदम साडवली येथील वनाझ कंपनीत सेवेत होते. १३ मार्चला सकाळी राजाराम कदम हे रिक्षाने देवरूख येथे तपासणीसाठी जात असताना त्यांना रिक्षेतच अस्वस्थ वाटू लागले. दवाखान्यात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
८९४८३
भारती सावंत यांचे निधन
रत्नागिरी ः बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४ आंबेशेत या शाखेच्या सदस्या भारती अशोक सावंत (वय ६३) यांचे रविवारी (ता. १२) रात्री निधन झाले. अत्यंत प्रेमळ, मनमिळावू स्वभावाच्या भारती सावंत यांचा सामाजिक कार्यात कायम सहभाग असायचा. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, पुतणे, पुतण्या, दीर, जावू, सुना, जावई, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे.