राजापूर पालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा

राजापूर पालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा

rat१६५.txt

अन्यथा राजापूर पालिकेवर हंडा मोर्चा काढणार

अ‍ॅड. खलिफे ; रानतळेतील पाणी टंचाईचा प्रश्न सोडवा

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः शहरातील रानतळे परिसरातील लोकांना सध्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून रानतळे येथील लोकांनी पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी रानतळे परिसरातील लोकांची नुकतीच भेट घेतली असून, येथील पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. त्याचवेळी नगर पालिका प्रशासनाने तत्काळ याची दखल न घेतल्यास नागरिकांना घेऊन नगर पालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा अ‍ॅड. खलिफे यांनी दिला आहे.
रानतळे भागातील लोकांना मागील काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीसाठ्यालगत बोअरवेलही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र नगर पालिका प्रशासनाने तो तत्काळ थांबवला. दरम्यान, पाणीटंचाईमुळे या भागातील नागरिकांनी पाणी सोडण्यासाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे साखरकरवाडीला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. या एकूणच पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. खालिफे यांनी नुकतीच रानतळे येथील लोकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी लोकांनी रानतळे भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून, पुरेसे पाणी मिळत नसल्याची व्यथा मांडली. फेब्रुवारी महिन्यापासून केवळ २० मिनिटे पाणी मिळत असून पालिकेने पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही केली. रानतळे येथील पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अ‍ॅड. खलिफे यांनी या वेळी रानतळेवासियांना दिली. नगर पालिका प्रशासनाने तत्काळ याची दखल न घेतल्यास नागरिकांना घेऊन नगर पालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा अ‍ॅड. खलिफे यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com