देसाई हायस्कूलच्या बालकलाकारांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देसाई हायस्कूलच्या बालकलाकारांचा सन्मान
देसाई हायस्कूलच्या बालकलाकारांचा सन्मान

देसाई हायस्कूलच्या बालकलाकारांचा सन्मान

sakal_logo
By

rat१६४०. txt

rat१६p३१.jpg ः
८९५१३
रत्नागिरी ः अ. के. देसाई हायस्कूलच्या ''राखेतून उडाला मोर'' या बालनाट्यातील चमूच्या सन्मानाच्यावेळी उपस्थित ज्येष्ठ रंगकर्मी.
------
देसाई हायस्कूलच्या बालकलाकारांचा सन्मान

बालनाट्य राज्यात प्रथम ; ज्येष्ठ रंगकर्मीकडून शुभेच्छा, प्रोत्साहन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या १९व्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या यशस्वी बाल कलाकार व तंत्रज्ञ यांचा येथील ज्येष्ठ नाट्य रंगकर्मींच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
अ. के. देसाई प्रशालेने ''राखेतून उडाला मोर'' हे बालनाट्य सादर केले होते. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे, समर्थ रंगभूमीचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, शशांक पाटील, डॉ. आनंद आंबेकर, नाट्यशास्त्र तज्ज्ञ सुशील जाधव, लेखक अमेय धोपटकर आणि मराठी रंगभूमीचे सर्व कलाकार आणि अनेक पालक उपस्थित होते.''राखेतून उडाला मोर'' या बालनाट्याच्या टीमचे अभिनंदन आणि कौतुक सर्व नाट्य रंगकर्मी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर या नाटकाचे दिग्दर्शक व प्रशालेचे शिक्षक, दिग्दर्शक संतोष गार्डी, संगीत दिग्दर्शक निखिल भुते, प्रकाश योजनाकार साईप्रसाद शिरसेकर, नेपथ्यकार प्रवीण धुमक या पारितोषिक विजेत्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच या बालनाट्याचे मार्गदर्शक ओंकार पाटील व स्वानंद मयेकर यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
हायस्कूलच्या बालकलाकारांनी मिळवलेले हे यश हे संपूर्ण रत्नागिरीकरांना अभिमानास्पद आहे. सुहास भोळे यांनी यशाची परंपरा अशीच चालू ठेवावी यासाठी आम्ही सर्व रंगकर्मी तुमच्यासोबत आहोत अशा प्रकारच्या शुभेच्छा सर्वांनी विद्यार्थ्यांना दिल्या. सर्वांनीच आपली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि नियोजनबद्ध पूर्ण केल्यामुळे हे यश आम्ही मिळवू शकलो, अशा प्रतिक्रिया दिग्दर्शक संतोष गार्डी यांनी व्यक्त केल्या. मिळवलेले यश टिकवणे ही मोठी जबाबदारी आता सर्व संघाची आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहा. नवीन नवीन गोष्टी शिकत राहा, अशा प्रकारच्या शुभेच्छा श्रीकांत पाटील याने संघाला दिल्या. तुम्ही जी भूमिका करत होता त्या भूमिकेचा हा विजय आहे. तुम्ही केलेले कर्तृत्व निश्चितच अधोरेखित करण्यासारखे आहे, असे मत प्रा. डॉ. आंबेकर यांनी व्यक्त केले. बालकलाकारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुलींच्या हस्ते केक कापण्यात आला.