''दलितवस्ती''चे 12 कोटी अखर्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''दलितवस्ती''चे 12 कोटी अखर्चित
''दलितवस्ती''चे 12 कोटी अखर्चित

''दलितवस्ती''चे 12 कोटी अखर्चित

sakal_logo
By

swt१६२३.jpg
८९५१९
सिंधुदुर्गनगरीः दी बुध्दिस्ट सोसायटीच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले.

''दलितवस्ती''चे १२ कोटी अखर्चित
''दी बुद्धिस्ट''चे सिंधुदुर्गनगरीत धरणे ः तीव्र आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ ः दलितवस्ती सुधार योजनेचा तब्बल १२ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा अखर्चित राहिलेला असून हा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करण्यात यावा, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. हा निधी मागे गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला.
जिल्हा परिषद अनुसूचित जाती आणि बांधवांचा विकास करण्यासाठी शासनाकडून दलित वस्ती सुधार योजना राबविली जात आहे. यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे; मात्र जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाला या योजनेंतर्गत १२ कोटी रुपयांचा प्राप्त झालेला विकास निधी मार्च अखेर होत आली तरी अद्याप खर्च झालेला नाही. ही बाब अनुसुचित जातींसाठी अन्यायकारक आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी दलित वस्तींचा विकास आराखडा प्रस्ताव पाठवूनही ते अद्याप प्रलंबित आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा विकास निधा परत न करता जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या लोकांच्या व त्यांच्या वस्त्यांच्या विकासासाठीच खर्च करण्यात यावा. हा निधी परस्पर अन्य खात्यांकडे वर्ग करण्यात येऊ नये. हा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करण्यात यावा, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्गच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, तानाजी कांबळे, प्रकाश कांबळे, सुभाष जाधव, भीमराव जाधव आदी उपस्थित होते. १२ कोटी रुपयांचा निधी शासनाला मागे गेल्यास समाजबांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला.
.............