खेडची एल्गार सभा विरोधकांच्या उरात धडकी भरवेल ः सचिन धाडवे

खेडची एल्गार सभा विरोधकांच्या उरात धडकी भरवेल ः सचिन धाडवे

खेडची रविवारची सभा धडकी भरवणारी!

सचिन धाडवे ः उद्धव ठाकरेंच्या सभेला प्रतिउत्तरासाठी जोरदार तयारी

खेड, ता. 16 ः खेड शहरातील एसटी मैदानावर रविवारी (ता. 19) शिवसेनेशी निष्ठावंत असलेल्या कडवट शिवसैनिकांचा एल्गार विरोधकांच्या उरात धडकी भरवेल, असा दावा शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
खेड शहरातील एसटीच्या मैदानात 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेतर्फे निष्ठावंतांची एल्गार सभा 19 मार्चला संध्याकाळी 5 वाजता त्याच गोळीबार मैदानात आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या तयारीविषयी माहिती देताना तालुकाप्रमुख धाडवे म्हणाले, ही सभा भव्यदिव्य न भूतो न भविष्यती करण्यासाठी शिवसैनिक तयारी करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम, पालकमंत्री उदय सामंत आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सर्व आरोपांचा समाचार प्रमुख वक्ते घेतील. कोकण हा स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहे आणि तो कधीही काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसणार नाही. खेड तालुका हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. सुमारे 2 हजार कार्यकर्त्यांची फौज कट्टर शिवसैनिक म्हणजे काय हे दाखवून देण्यासाठी शाखा शाखांमध्ये बैठका घेऊन विराट सभेची तयारी करत आहे. या सभेमध्ये शिवसेना नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अनेक गावातील सरपंच त्यांच्या शेकडो समर्थकांसह या सभेत जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत. यावेळी सचिव शांताराम म्हसकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com