खाद्यतेलाचा टॅंकर उलटला, चालक गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाद्यतेलाचा टॅंकर उलटला, चालक गंभीर
खाद्यतेलाचा टॅंकर उलटला, चालक गंभीर

खाद्यतेलाचा टॅंकर उलटला, चालक गंभीर

sakal_logo
By

-rat१६p३३.jpg ः
८९५३५
लांजा ः आंजणारीजवळ उलटलेला खाद्यतेलाचा टॅंकर.
-
खाद्यतेलाचा टॅंकर उलटला
लांजा, ता. १६ ः मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी घाटातील तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने खाद्यतेलाची वाहतूक करणारा टँकर उलटला. हा अपघात गुरुवारी (ता. १६) मार्चला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.
जयप्रकाश जयराम यादव (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) हे टँकरमधून खाद्यतेल घेऊन मुंबई ते गोवा असा प्रवास करत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा टँकर आंजणारी घाटातील तीव्र उतारावर आला असता टँकरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे हा टँकर उतारावर महामार्गाच्या शेजारी उलटला. अपघातामध्ये टँकरचालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची गळती सुरू झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे, हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे, राजू कांबळे, चावरे, संजय जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे हातखंबा महामार्ग वाहतूक पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले.
महामार्गावर तेलगळती सुरू असल्याने संभाव्य अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता तेलगळती रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच हा टँकर उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालक जयप्रकाश यादव यांना प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद करण्याची प्रक्रीया पोलिस ठाण्यात सुरू होती. टँकरमध्ये खाद्यतेल असल्याचे समजताच आंजणारी मठ, नाणिज परिसरातील लोकांनी हे तेल नेण्यासाठी रांगा लावल्या होत्या.