बचतगटांच्या वस्तूंना बाजारपेठ द्यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचतगटांच्या वस्तूंना बाजारपेठ द्यावी
बचतगटांच्या वस्तूंना बाजारपेठ द्यावी

बचतगटांच्या वस्तूंना बाजारपेठ द्यावी

sakal_logo
By

swt1629.jpg
89531
झरेबांबरः ‘नवतारका’ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पूर्वा गवस. व्यासपीठावर संगीता देसाई व अन्य. (छायाचित्रः संदेश देसाई)

बचतगटांच्या वस्तूंना बाजारपेठ द्यावी
संगीता देसाईः झरेबांबरमध्ये ''नवतारका'' कार्यक्रमात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १६ः महिलांनी जागतिक महिला दिनापुरते मर्यादित न राहता येणाऱ्या काळात प्रत्येक महिला सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. महिला बचतगटांना विविध संस्थांनी प्रशिक्षण दिले; मात्र उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळत नसल्याने क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेंतर्गत बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून महिलांना रोजगारनिर्मिसाठी पाठबळ मिळेल, असे प्रतिपादन स्मार्ट ग्रामपंचायत कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई यांनी केले.
झरेबांबर गावठाण येथे महिला दिनानिमित्त आयोजित ‘महिला नावतारा’ कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा पूर्वा गवस यांनी मार्गदर्शन करताना महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. यावेळी त्यांनी अकबर-बिरबल यांच्या ‘कोंबडी झुंज’ या गोष्टीच्या माध्यमातून उपस्थितांना प्रबोधन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झरेबंबार सरपंच अनिल शेटकर, उपसरपंच शाम नाईक, सदस्य संजना आजरेकर, नीता नाईक, उमेश सातार्डेकर, ग्रामसेविका राणे, दोडामार्ग पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस दुखडे, कदम माजी सरपंच स्नेहा गवस, पोलिस पाटील चंद्रशेखर सावंत, माजी उपसंरपच काशिनाथ शेटकर, मनोज सावंत अंकिता साळगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी पाक कला व रांगोळी स्पर्धांमध्ये विजेत्यांना प्रमाणपत्र व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रांगोळी स्पर्धेत हर्षदा शेटकर, स्नेशा नाईक, प्रिया गवस, तर पाककला स्पर्धेत प्रांजल नाईक, संजना आजरेकर, रुचिका घाडी, आदींना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन नीता नाईक, प्रास्ताविक रिया घाडी यांनी केले. आभार संचिता गवस यांनी मानले.
...............