
क्राईम पट्टा
चाफेतील हातभट्टीवर छापा
रत्नागिरीः तालुक्यातील चाफे-देऊड येथे विनापरवाना हातभट्टी गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात साहित्यासह ७६० रुपयांची १० लिटर दारू जप्त केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित वृद्ध महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लिलावती कांबळे (वय ६३) असे संशयित वृद्ध महिलेचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी (ता. १५) साडेतीनच्या सुमारास चाटवळवाडी येथे निदर्शनास आली. त्यानुसार ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंबधी महिला पोलिस नाईक अमिता पाटील यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
--------
लाला कॉम्प्लेक्समधून दुचाकीची चोरी
रत्नागिरी ः शहरातील लाला कॉम्प्लेक्समधील इन्फिनिटी कॅफेसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. ७) दुपारी अडीच ते सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुहान इस्माईल सय्यद (वय २०, रा. संजीवनी नगर गोळपसडा) यांनी त्यांची दुचाकी ही लाला कॉम्प्लेक्समधील इन्फिनिटी कॅफेसमोर हॅंडल लॉक न करता लावून मित्रासोबत भैरी उत्सवाकरिता जाऊन परत आले; मात्र या अवधीत त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवली. या प्रकरणी सुहान सय्यद यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.