रत्नागिरी-क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-क्राईम
रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

sakal_logo
By

पान ३ साठी

घरफोडीप्रकरणी संशयिताला कोठडी

रत्नागिरी, ता. १६ः शहरातील हिंदू कॉलनी येथील चार महिन्यांपूर्वी बंगला फोडून १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणातील संशयिताला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. बाबू दाउद शेख (वय ३८, मुळ रा. छत्तीसगड सध्या रा.गोवंडी, मुंबई) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत विनय वेरनेकर (रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ते कुटुंबासह बाहेर गावी गेले होते. या कालावधीत अज्ञाताने त्यांच्या बंगल्याच्या किचनच्या खिडकीचे स्लायडिंग बाजूला करुन ग्रील वाकवून रोख २० हजार आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. पोलिसांनी बाबू शेखला काही दिवसांपूर्वी मुंबईतून अटक केली.