पाडलोस-माडाचे गाळव पूल दुरुस्तीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाडलोस-माडाचे गाळव पूल दुरुस्तीची मागणी
पाडलोस-माडाचे गाळव पूल दुरुस्तीची मागणी

पाडलोस-माडाचे गाळव पूल दुरुस्तीची मागणी

sakal_logo
By

swt1633.jpg
89547
पाडलोसः येथे वाहतुकीस धोकादायक ठरलेला पूल. (छायाचित्रः नीलेश मोरजकर)

पाडलोस-माडाचे गाळव
पूल दुरुस्तीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ः पाडलोस-माडाचे गाळव मोरीपुलाचा अर्धा भाग कोसळून तीन महिन्यांचा कालावधी उलटला; परंतु अद्याप याकडे आश्वासन देणाऱ्यांसह लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी व प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले. सद्यस्थितीत पूल वाहतुकीस धोकादायक बनले असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीस निर्धोक करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
डिसेंबर महिन्यात पाडलोस माडाचे गाळव पूल अचानक खचल्याने चिरे वाहतूक करणारा डंपर कोसळून अपघात झाला होता. या पुलाचे बांधकाम तीस वर्षांपूर्वी केलेले असून तो कमकुवत झाला आहे. पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने तत्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे. ग्रामस्थांना वाडीमध्ये जाण्यासाठी याच एकमेव मार्गाचा वापर करावा लागतो. पावसाळ्यात हलका जरी पाऊस पडल्यास पूल पाण्याखाली जातो. पुलाची उंची वाढविण्यासाठी वारंवार मागणी करण्यात आली, मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यात पूल वाहून गेल्यास वाडीचा मुख्य गावाशी संपर्क तुटणार असून विद्यार्थ्यांसह नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी व प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष देऊन पूल वाहतुकीस निर्धोक करावा, अशी मागणी पाडलोस-माडाचे गाळव ग्रामस्थांनी केली आहे.