-संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतवे

-संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतवे

-rat१६p३५.jpg-
८९५५५
रत्नागिरी ः संपकऱ्यांना पुन्हा कामावर हजर होण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा केली.
-
संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ; राज्यस्तरीय निर्णयावर आमचा निर्णय

रत्नागिरी, ता. १६ : जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी संपावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांशी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज बैठक घेऊन चर्चा केली. कामावर परत हजर व्हा, असे आवाहन केले. तिसऱ्या दिवशीही संपामुळे संपूर्ण कामकाज ठप्प झाले होते.
बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड उपस्थित होते. राज्यातील सरकारी कार्यालयांमधील २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजन लागू करण्याची मागणीसाठी सर्व कर्मचारी संपावर आहेत. हा संपाचा निर्णय सरकारी संघटनेचा असून त्याबाबत राज्य स्तरावर निर्णय झाल्यावर संघटनेचा निर्णय असेल त्याप्रमाणे निर्णय घेऊ, असे संपकऱ्यांच्या शिष्टमंडळाने यावेळी सांगितले.
दरम्यान, संपकाळात तत्कालीन सेवांवर परिणाम होवू नये यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी खबरदारी घ्यावी व कामाचे व्यवस्थापन करावे, असे जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी आज अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. संपकऱ्यांची बैठक घेऊन विभाग प्रमुखांनी त्यांना स्वतंत्रपणे आवाहन करण्याचे सूचनाही त्यांनी दिल्या.
-
संघटनाच्या दबावाने आरोग्य कर्मचारीही संपात
आजच्या तिसऱ्या दिवशीही संप कायम होता. आरोग्य सेवेचे सर्व कर्मचाऱ्यांनी संघटनांचा विरोध झुगारुन रुग्णांना सेवा दिली होती. परंतु आज पुन्हा संघटनांच्या दबावामुळे सर्व कर्मचारी संपात सामिल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com