कणकवली उड्डाण पुलाखालील स्टॉल आजपासून हटवले जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली उड्डाण पुलाखालील स्टॉल आजपासून हटवले जाणार
कणकवली उड्डाण पुलाखालील स्टॉल आजपासून हटवले जाणार

कणकवली उड्डाण पुलाखालील स्टॉल आजपासून हटवले जाणार

sakal_logo
By

kan१६६.jpg
८९५७१
कणकवली : शहरातील उड्डाण पुलाखालील स्टॉल उद्यापासून हटवले जाणार आहेत .

कणकवली उड्डाण पुलाखालील
स्टॉल आजपासून हटवले जाणार
महामार्ग विभागाची मोहीम : पोलिसांनी केली रंगीत तालीम
कणकवली, ता. १६ : कणकवली शहरातील मुंबई गोवा महामार्ग उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे उभारण्यात आलेले स्टॉल हटवण्याची मोहीम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून हाती घेतली आहे. १७ व १८ मार्च या दोन दिवसात स्टॉल हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कणकवली पोलिसांना बंदोबस्तासाठी लेखी पत्र दिले आहे. त्यासंबंधी स्टॉल धारकांनाही लेखी नोटीसा बजावल्या आहेत.
कणकवली शहरात महामार्ग चौपदरी करणावेळी शेकडो स्टॉलधारक बाधीत झाले होते. या स्टॉलधारकांचे नंतर उड्डाण पुलाखाली पुनर्वसन करण्यात आले होते. चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर आता तीन वर्षानंतर स्टॉल हटवले जाणार असल्याने स्टॉल धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने कणकवली पोलिसांना बंदोबस्तासाठी लेखी पत्र दिले होते. त्यानंतर आज कणकवली पोलिसांनी बंदोबस्ताची रंगीत तालीम केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, महिला उपनिरीक्षक वृषाली बर्गे,उपनिरीक्षक सरदार पाटील, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, पोलीस पांडुरंग पांढरे आदींसह पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते.