स्टॉलधारकांची उच्च न्यायालयात धाव

स्टॉलधारकांची उच्च न्यायालयात धाव

स्टॉलधारकांची उच्च न्यायालयात धाव
वैभववाडीतील प्रश्नः आठ जणांची याचिका
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १६ः वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने राबविलेल्या स्टॉल हटाव मोहिमेविरोधात येथील आठ स्टॉलधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नगरपंचायतीच्या कारवाई विरोधेात उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यामुळे आता स्टॉलधारक न्यायालयीन लढाई लढणार हे स्पष्ट झाले आहे.
वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने जुना कोकिसरे रस्ता, सडुरे रस्ता आणि फोंडा-उंबर्डे मार्गावरील स्टॉल २३ फेब्रुवारीला हटविले. स्टॉल हटाव मोहिमेला स्टॉलधारकांनी विरोध करत नगरपंचायत कार्यालयाबाहेर दोन दिवस उपोषण केले. त्यानंतर हटाव मोहीम राबविताना देखील जेसीबीवर चढून आक्रमक भुमिका घेतली होती. तरी देखील प्रशासनाने पोलिस बळाचा वापर करीत शहरातील शासकीय जमीन आणि रस्त्याकडेचे सर्व स्टॉल हटविले. राबविण्यात आलेल्या स्टॉल हटाव मोहिमेविरोधात महिला स्टॉलधारकांनी येथील तहसील कार्यालयाबाहेर सहा दिवस उपोषण केले. त्या आंदोलनानंतर देखील स्टॉलधारकांच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय झाला नाही. त्यामुळे आठ स्टॉलधारकांनी नगरपंचायतीने राबविलेल्या स्टॉल हटाव मोहिमेविरोधात वकील एकनाथ ढोकळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आपण १९९० पासून या ठिकाणी पथविक्रीच्या माध्यमातून उपजीविका चालवत आहोत. २०१५ मध्ये वाभवे वैभववाडी ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, त्यानंतर सुध्दा आतापर्यंत हे व्यवसाय सुरू होते. स्टॉलधारक सुरुवातीच्या ग्रामपंचायतीला आणि त्यानंतर नगरपंचायतीला स्टॉलबद्दलचा कर भरीत होते. असे असताना १९ जानेवारीला नगरपंचायतीने स्टॉलधारकांना स्टॉल हटावाची नोटीस काढली. त्यानंतर २३ फेब्रुवारीला स्टॉल हटविण्याची कारवाई केली. ही कारवाई अन्यायकारक असून स्टॉलधारकांची रोजीरोटी हिरावून घेतली आहे. त्यामुळे नगरपंचायतीने केलेली कारवाई बेकायदेशीर ठरविण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून केली आहे. याशिवाय मूळ जागी पुन्हा पथविक्री करण्याची परवानगी द्यावी तसेच बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या नगरपालिका अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या याचिकेद्वारे करण्यात आल्या आहेत. वकील एकनाथ ढोकळे यांनी ही याचिका दाखल केली असून वकील सुदीप कांबळे हे त्यांना सहकार्य करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com