वैभव नाईकांचे आरोप वैफल्यातून

वैभव नाईकांचे आरोप वैफल्यातून

swt1637.jpg
89578
मालवणः शिवसेनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तालुकाप्रमुख राजा गावकर व अन्य.

वैभव नाईकांचे आरोप वैफल्यातून
राजा गावकरः शिवसेनेत प्रवेश करावा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : आमदार वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त होऊन शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, मंत्री दीपक केसरकर व मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करत आहेत. रवींद्र फाटक यांना जिल्ह्याबाहेर काढण्याची भाषा करणारे आमदार नाईक यांची टीका करण्याची ऐपत नाही. नाईकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध असल्याने त्यांनी आमच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करावा, असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले. आमदार नाईक आमच्या पक्षात आल्यास त्यांना आमच्या पक्ष संघटनेत ढवळाढवळ करता येणार नाही, असेही गावकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी तालुकाप्रमुख गावकर, महेश राणे, किसन मांजरेकर, बबन शिंदे, रिया आचरेकर, गीता नेवाळे, पराग खोत, अरुण तोडणकर, भारती घारकर, शबनम शेख, बाळू नाटेकर, लुईदीन फर्नांडिस, शिल्पा तोंडवळकर, शाहीन शेख, राजा तोंडवळकर आदी उपस्थित होते.
गावकर म्हणाले, ‘‘शिवसेनेचे नवनियुक्त लोकसभा मतदार संघ संपर्कप्रमुख फाटक यांच्यावर आमदार नाईक टीका करत आहेत; मात्र फाटक यांच्या ताकदीची त्यांना कल्पना नाही. माजी आरोग्य मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागे रवींद्र फाटक यांचीच कामगिरी आहे. त्यामुळेच फाटक हे असेच आणखी प्रवेश घेत राहतील, या भीतीने आमदार नाईक त्यांना जिल्ह्याबाहेर काढण्याची भाषा करत आहेत. आज आपण निधी आणल्याचा दावा आमदार नाईक करत आहेत; मात्र हा निधी त्यांनी आणला नसून तो मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजूर केला आहे. महामार्गावर लागलेल्या भगवा चषक क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरमध्ये आमदार नाईक यांचा फोटो दिसत नाही. आमदार नाईक व खासदार विनायक राऊत यांच्यात काय सुरू आहे, हे सर्वश्रुत आहे. तौक्ते वादळ काळात एकनाथ शिंदे यांनी पुरविलेल्या मदतीमधूनच नाईक यांनी वादळग्रस्तांना मदत केली. त्यामुळे नाईक यांचे स्वतःचे कर्तृत्व काय, हे आम्हाला माहीत आहे. मंत्री केसरकर व मंत्री सामंत यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार नाईकांची त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची ऐपत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध असणारे आमदार नाईक यांनी आमच्या शिवसेनेत येत असतील तर त्यांनी जाहीर प्रवेश करावा. तसे झाल्यास ती मोठी राजकीय उलथापालथ असेल; मात्र आमच्या पक्ष संघटनेत त्यांना ढवळाढवळ करता येणार नाही."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com