घोडगे मळेवाडी येथील जंगलामध्ये मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडगे मळेवाडी येथील जंगलामध्ये मृतदेह
घोडगे मळेवाडी येथील जंगलामध्ये मृतदेह

घोडगे मळेवाडी येथील जंगलामध्ये मृतदेह

sakal_logo
By

घोडगे मळेवाडी जंगलात
वृद्धाचा मृतदेह सापडला
कुडाळ, ता. १६ : घोडगे मळेवाडी येथील जंगलामध्ये सुमारे ८० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला . हा मृतदेह ओरोस येथील शवगृहात ठेवण्यात आला आहे. हा मृतदेह जंगलातून पोलीस व स्थानिक नागरिकांनी घेऊन आले.
घोडगे मळेवाडी येथील जंगलामध्ये मृतदेह आढळून आला. विजय नाईक यांचा मुलगा या जंगलातून आपल्या पाहुण्यांजवळ जात असताना हा प्रकार दिसला होता. याबाबत त्यांनी आपले वडील नाईक यांना सांगितले. दरम्यान पोलीस हवालदार मंगेश जाधव व माजी जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर व त्यांचे सहकारी हे जंगलात ५ किलोमीटर चालून गेले आणि मृतदेह घेऊन आले. हा मृत गावातील किंवा आजूबाजूतील परिसरातील नसल्याचे उघड झाले. याबाबत पोलिसांनी खातर जमा करून मृतदेह ओरोस येथील शवगृहात ठेवला असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत हा सुमारे ८० वर्षाचा असल्याचे उपनिरीक्षक सागर शिंदे यांनी सांगितले.