भार्गवी सुर्वे हिला बालकलाकार पुरस्कार प्रदान

भार्गवी सुर्वे हिला बालकलाकार पुरस्कार प्रदान

rat1714.txt

89646
भार्गवी सुर्वेला बालकलाकार पुरस्कार

साखरपा, ता. 17 ः साखरपा जाधववाडी येथील नववीतील विद्यार्थिनी भार्गवी सुर्वे हिला उत्कृष्ट बालकलाकार या सन्मानाने सन्मानित करण्यात आला आहे. कलानगरी कोल्हापूर मराठी फिल्म फेस्टिव्हलमध्ये मयूरी या लघुपटातील तिच्या भूमिकेबद्दल तिला हा सन्मान मिळाला आहे.
संस्कृती फाउंडेशन लांजा याच्यातर्फे मयुरी या लघुपटाची निर्मिती करण्यात आली होती. महिला सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या पोक्सो कायद्याबाबत आणि लहान मुलांचे शोषण याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने लघुपटाची निर्मिती करण्यात आली होती. प्रसाद नाईक निर्मित आणि राज मोहिते दिग्दर्शित या लघुपटाचे लेखन राजेश गोसावी यांनी केले होते. या लघुपटात मध्यवर्ती असलेली मयुरी ही भूमिका साखरपा जाधववाडी येथील भार्गवी सुर्वे या कबनूरकर इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थिनीने साकारली होती. तिच्यासह भडकंबा येथील कलाकार अतुल शिर्के आणि तृप्ती मोरे यांनीही या लघुपटात भूमिका साकारल्या होत्या. कलानगरी कोल्हापूर मराठी फिल्म फेस्टिव्हलमध्ये मयुरीच्या भूमिकेसाठी भार्गवीला नामांकन मिळाले होते. या फेस्टिव्हलचे पारितोषिक वितरण समारंभ नुकताच कोल्हापूर येथे पार पडले. त्यात भार्गवीला उत्कृष्ट बालकलाकार मुलगी हे पारितोषिक मिळाले आहे. भार्गवीच्या यशाबद्दल संस्कृती फाउंडेशनचे राजेश गोसावी, प्रसाद नाईक, राज मोहिते यांच्यासह मयुरीच्या सर्व टीमने तसेच कबनूरकर स्कूलच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्‍यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com