
होप फाऊंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा यांना जीवनगौरव
89652
होप फाऊंडेशनच्या अध्यक्षा
अरुणा कटारा यांना जीवनगौरव
रत्नागिरी, ता. १८ : शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल होप फाऊंडेशन आणि रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा एम. कटारा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एसएमएक्स नेटवर्कने महिला उद्योजकता आणि इनोव्हेशन कॉनक्लेव्ह २०२३ अंतर्गत हा पुरस्कार अरुणा कटारा यांना एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे (पुणे) अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांच्या हस्ते पुण्यातील शेरेटन ग्रँड हॉटेल येथे प्रदान करण्यात आला. या वेळी इनोसर्व ग्रुपचे अध्यक्ष रामचंद्रन गोपालकृष्णन उपस्थित होते.
समतोल राष्ट्रीय विकासासाठी महिला उद्योजकांचा शाश्वत विकास घडवून आणण्यावर एसएमएक्स नेटवर्कने महिला उद्योजकता आणि इनोव्हेशन कॉनक्लेव्हचे आयोजन केले. भारताला विविध क्षेत्रात जागतिक स्तरावर सर्व आघाड्यांवर स्पर्धा करत अग्रेसर बनवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी देशात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे अशा उद्योजक आणि स्टार्ट-अप इकोसिस्टम प्लेयर्सच्या कामगिरीची ओळख आणि सन्मान या कार्यक्रमात केला गेला.
महिला उद्योजकता आणि इनोव्हेशन कॉनक्लेव्ह कार्यक्रमात २० पेक्षा जास्त नामांकित नेते, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, सरकारी उपक्रम आणि थिंक टँक यांना एकाच छताखाली आणले गेले. सतत बदलणारे आणि विकसित होणारे दृष्टिकोन आणि वाढीच्या संधींवर या कार्यक्रमात चर्चा झाली. शंभरहुन अधिक प्रमुख उद्योग भागधारकांसह नेटवर्किंगच्या संधी प्रदान केल्या.
श्रीमती अरुणा कटारा यांना मिळालेला जीवनगौरव पुरस्कार हे त्यांच्या उच्च शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याची पोच पावती आहे. होप फाऊंडेशन हे फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन शैक्षणिक संस्था आणि प्रल्हाद पी. छाब्रिया रिसर्च सेंटर या संशोधन क्षेत्रातील संस्थाच्या माध्यमातून भारतातील शेकडो विद्यार्थ्यांना कौशल्य आणि ज्ञानाने सुसज्ज करण्याबरोबरच उद्योग संधी उपलब्ध करून देते. समाजाभिमुख कार्य करण्याचा हा वारसा त्यांना त्यांचे वडील आणि फिनोलेक्स ग्रुप ऑफ कंपनीज् आणि होप फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष (कै.) प्रल्हाद पी. छाब्रिया यांच्याकडून मिळाला आहे.