
माजगावात महिलांची आरोग्य चिकित्सा
89663
माजगाव ः सरपंच अर्चना सावंत, रेश्मा सावंत, संजय कानसे, संतोष वेजरे आदींनी शिबिराचे उद्घाटन केले.
माजगावात महिलांची आरोग्य चिकित्सा
सावंतवाडी ः एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने माजगाव येथील महिला दिनाचे औचित्य साधून काल (ता. १६) महिलांची आरोग्य चिकित्सा करण्यात आली. माजगाव शाळा नंबर १ येथे हे शिबिर झाले. सरपंच डॉ. अर्चना सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, उपसरपंच संतोष वेजरे, पंच सदस्य संजय कानसे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. डॉ. सुप्रिया धाकोरकर यांनी प्रास्ताविक केले. शिबिरात स्तनांचा कर्करोग, ईसीजी, तोंडाचा कर्करोग आदी तपासण्या डॉ. पूर्वा राऊत, डॉ. प्रणाली पाटील. डॉ. रिजवान बोबडे, डॉ. संजय जोशी यांनी केल्या. या शिबिराचा गावातील महिलांनी लाभ घेतला.
................
निमेवाडी स्मशानभूमीचे नूतनीकरण
कणकवली ः येथील निमेवाडीतील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम मंजूर होऊन कामास सुरुवातही झाली आहे. स्मशानभूमीच्या कामाची मागणी नगरसेविका कविता राणे यांनी केली होती. याबाबत ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.