दीपक कदमांच्या ‘पुरशा’ची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीपक कदमांच्या ‘पुरशा’ची बाजी
दीपक कदमांच्या ‘पुरशा’ची बाजी

दीपक कदमांच्या ‘पुरशा’ची बाजी

sakal_logo
By

89662
कोल्हापूर ः आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान स्वीकारताना ‘पुरशा’ची टीम.

दीपक कदमांच्या ‘पुरशा’ची बाजी

सर्वोत्कृष्टेचा मान; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोकणचे सुपुत्र दिग्दर्शक दीपक कदम यांच्या ‘पुरशा’ चित्रपटाला १४ नामांकने अणि पाच पारितोषिकांसहित सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला.
कोल्हापूर येथे १३ मार्चपासून आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवात देशविदेशातून अनेक विषयांवरील चित्रपटांचा सहभाग होता. या चित्रपट महोत्सवामध्ये निवडक चित्रपटांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यामध्ये दीपक कदम निर्मित आणि दिग्दर्शित ‘पुरशा’ या चित्रपटाने बाजी मारली. हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला. चित्रपट संपताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व कलाकारांचे स्वागत केले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट पोस्टर डिझाईन असे पुरस्कार मिळाले. तसेच वेगवेगळ्या १४ विभागांमध्ये मानांकने मिळाली. हा चित्रपट महोत्सवात दाखवल्यापासून महाराष्ट्रात कधी प्रदर्शित होणार, याची चर्चा रंगली होती. अशा वेगळ्या आशयाचे, विषयाचे अणि धाटणीचे चित्रपट येणे गरजेचे आहे आहे, असे मत परीक्षकांनी मांडले. या चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून अभिजित पानसे, समृद्धी पोरे यांनी काम पाहिले. पोरे यांनी एवढ्या चित्रपटांचे परीक्षण करून त्यांची निवड करणे खूप कठीण होते. कारण बरेच वेगळ्या विषयांचे चित्रपट या महोत्सवात आले होते, असे सांगितले. विजय कदम, सुदिन तांबे, अंकिता भोईर, शिल्पा सावंत, कार्यकारी निर्माता राजेंद्र सावंत, दिग्दर्शक दीपक कदम, बिपला जाधव, सुकुमार भोसले, बलराज जाधव यांची उपस्थिती होती. सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच आयोजक महादेव साळोखे यांनीही ‘पूरशा’च्या समुहाचे अभिनंदन केले.