
गायन पार्टी स्पर्धेचे मालवणात आयोजन
गायन पार्टी स्पर्धेचे
मालवणात आयोजन
मालवण ः येथील आंबेडकर फुले, शाहू विचारमंचतर्फे १४ एप्रिलला दुपारी २ ते ६ या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह येथे गायन पार्टी स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथम आठ संघांना सहभागी करून घेण्यात येईल. स्पर्धकांना नियमावली दिली जाईल. संघांनी राजेंद्र कदम, विलास देऊलकर, रंजन तांबे, श्रीकांत मालवणकर यांच्याकडे नावे द्यावीत, असे आवाहन अध्यक्ष आनंद मालवणकर व सचिव संजय जाधव यांनी केले आहे.
----------------
बांदा येथे २५ ला
धार्मिक कार्यक्रम
बांदा : येथील आळवाडीतील श्री पाटेश्वर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे येथील पाटेश्वर मैदानावर प्रतिवर्षी आयोजित केली जाणारी सत्यनारायण महापूजा यंदा २५ ला होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमत्ताने सकाळी दहाला सत्यनारायण महापूजा, महाआरती, तीर्थ प्रसाद, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजन व रात्री पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ले यांचा महान पौराणिक ‘स्पर्श मणी’ नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
--------------------
आंबेडकर समाज
समितीतर्फे आवाहन
बांदा : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती, सावंतवाडीची जयंती विशेष सभा रविवार (ता. १९) सकाळी दहाला समाजमंदिर, सावंतवाडी येथे आयोजित केली आहे. या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे नियोजनासंबंधी आढावा घेणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे. बांधवानी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव व सचिव सुरेश जाधव यांनी केले आहे.
--
माजगावात बुधवारी
दोन नाट्यप्रयोग
ओटवणे ः माजगाव-कासारवाडा येथील श्री देव चव्हाटा मंदिर येथे गुढीपाडव्यानिमित्त बुधवारी (ता. २२) रात्री नऊला श्री कालिका देवी प्रासादिक नाट्य समाज ‘शंभुराजे’ हे ऐतिहासिक नाटक सादर करणार आहे. तर कालिका प्रासादिक महिला नाट्यमंच ‘कलंकिनी मी तुझ्यासाठीच’ हे संगीत नाटक सादर करणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
-----------------
वेंगुर्लेत ग्राफिक
डिझाईनर प्रशिक्षण
वेंगुर्ले ः दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत येथील पालिकेतर्फे मोफत ग्राफिक डिझाईनर, सोलर पॅनल इंस्टॉलेशन टेक्नीशियन, मेकअप आर्टिस्ट हे तीन महिने कालावधीचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुबरे किंवा समुदाय संघटक अतुल अडसुळ यांच्याशी संपर्क साधावा.