
राजापुरातील रस्ते, पुलासाठी 50 कोटी निधी
राजापुरातील रस्ते, पुलासाठी ५० कोटी निधी
राजापूर, ता. १७ ः राजापूर विधानसभा मतदार संघातील रस्ते आणि पुलासाठी तब्बल ४९ कोटी ७६ लाखाचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पातून मंजूर झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या विविध विकासकामांना चालना मिळणार आहे. ग्रामीण रस्त्यांसाठी ५ कोटी, पूल बांधकामासाठी १२ कोटी २५ लाख, घाटरस्ता आणि बंधाऱ्याला ३ कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आला आहे. प्रमुख राज्यमार्ग रस्त्यासाठी व पूल बांधकाम पुनर्बांधणीसाठी २८ कोटी ७६ लाख निधी मंजूर झाला आहे. यामध्ये शिपोशी हरिहरेश्वर मंदिर येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करणे ५ कोटी, प्रभानवल्ली खोरनिनको महालक्ष्मी मंदिर येथे पुलाचे बांधकाम करणे ४ कोटी, तेरवण बाईंगवाडी बौद्धवाडी येथे पूल बांधकाम करणे १ कोटी ५० लाख, गोळवशी आंबा गुरववाडी धामणवाडी ते धावजीमंदिर पूल बांधकाम करणे १ कोटी ७५ लाख, बेनगी नागलेवाडी बंधारा बांधकाम ७५ लाख रु., भांबेड कोलेवाडी मौजेमांजरे गावडी घाट १ कोटी, देवडे-भोवड विशाळगड घाट १ कोटी, काजिर्डा-कोल्हापूर घाटरस्ता १ कोटी, ग्रामीण रस्त्यांसाठी ५ कोटी, प्रमुख राज्यमार्ग रस्त्यासाठी व पूल पुनर्बांधणीसाठी २८ कोटी ७६ रु. यांचा समावेश आहे. या कामांची प्रशासकीय पूर्तता आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लवकरच कामांना सुरवात होणार आहे.