कोकण रेल्वेमार्गावर वसई-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण रेल्वेमार्गावर वसई-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करा
कोकण रेल्वेमार्गावर वसई-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करा

कोकण रेल्वेमार्गावर वसई-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करा

sakal_logo
By

वसई-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करा
कोरे प्रवासी संघटना ; मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय
रत्नागिरी, ता. १७ः सण-उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी वसई-सावंतवाडी पॅसेंजर कायमस्वरूपी सोडावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याबाबतही चर्चा झाली.
कोकणातील चाकरमान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या नालासोपारा येथे झालेल्या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. शांताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत वसई-सावंतवाडी पॅसेंजर का महत्वाची आहे यावर मत जाणून घेण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून याचा सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे जड्यार यांनी सांगितले. गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे शिफारस करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याची सूचना सुनील मासये यांनी केली.
कोकण रेल्वेवरील खेड आणि चिपळूण ही स्टेशन खूप गर्दीची असल्याने तेथपर्यंत ही गाडी चालवल्यास कोकण रेल्वेवरील गर्दीचा भार कमी होईल, असे सुचवण्यात आले तसेच कोकण रेल्वेच्या प्रकल्पासाठी प्रा. मधू दंडवते यांचे मोठे योगदान आहे. खऱ्या अर्थाने ते कोकण रेल्वेचे शिल्पकार आहेत. त्यासाठीच प्रा. मधू दंडवते वसई-सावंतवाडी पॅसेंजर किंवा एक्स्प्रेस गाडी कोकण रेल्वेमार्गावर सुरू करावी किंवा ते शक्य न झाल्यास सावंतवाडी टर्मिनसला त्यांचे नाव द्यावे, अशी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे.